Electronics Price Hike Saam Tv
बिझनेस

Electronics Price Hike: एसी, टीव्ही, फ्रिजच्या किंमती १० ते १२ टक्क्यांनी वाढल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

AC, TV, Fridge Electronics Items Price Hike: सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता टीव्ही, फ्रिज, एसीच्या किंमतीत वाढ झाली आहे. हे दर १० ते १२ टक्क्यांनी वाढले आहेत.

Siddhi Hande

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती वाढल्या

आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम

ऐन उन्हाळ्यात मागणीदेखील फ्रिज, एसीच्या मागणीत वाढ

खरेदीदारांच्या खिशाला फटका

आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम जगावर होत आहे. दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या आणि एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदादारांच्या खिशाला फटका बसणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागल्या (Electronic Items Price Hike)

एलपीजी गॅसचा तुटवडा होता. त्यामुळे अनेकांना इलेक्ट्रॉनिक शेगडी वापरण्याचा पर्याय निवडला.दरम्यान आता इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणीदेखील खूप वाढली आहे. त्यामुळे शेगड्यादेखील मिळत नाहीयेत. काही प्रमाणावर इंधनाचे टंचाईमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू येत नाहीत. युद्ध अजून काही दिवस असं सुरू राहिला तर इलेक्ट्रॉनिक वस्तू आणखी मागण्याची शक्यता आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर बसताना दिसत आहे.

टीव्ही, एसी, फ्रिजच्या किंमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ (TV, AC, Fridge Price Increase By 10 to 12 Percent)

जीएसटी कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, आता आखाती देशातील युद्धाचा परिणाम कच्च्या मालाच्या आयातीवर झाला आहे. यामुळेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत तब्बल १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातच इंधन टंचाईमुळे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने महागाईचा भार अधिकच वाढला आहे.

उन्हाळ्यामुळे एसी, कुलर, फ्रिज यांची मागणी वाढलेली आहे. परंतु कच्चा माल आयात होत असल्याने, प्रवास खर्चदेखील वाढल्याने या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक शेगड्यांचीही टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. येणाऱ्या काळात युद्धस्थिती कायम राहिल्यास इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

टीव्ही एसीच्या किंमती वाढल्या (TV, AC Price Hike)

टीव्ही एसीच्या किंमती वाढल्या आहेत. आधी ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही ६,५०० रुपयांना मिळायचा. आता हे दर ८,५०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. लवकरच हे दर १०,००० रुपयांवर जाऊ शकतात. तसेच १.५ टनचा एसी मागच्या वर्षी ३२,००० ते ३४,००० रुपयांपर्यंत मिळायचा. आता हे दर ३७,००० ते ४०,००० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jaspal Rana: मनु भाकरचे प्रशिक्षक नेमबाज जसपाल राणा यांचं निधन; वयाच्या 49 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात

फक्त २ सोपे उपाय अन् चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्लो

Accident : भरधाव कार झाडाला धडकली;एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ४ जण गंभीर जखमी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा! 'या' तारखेला जमा होणार मे महिन्याचे पैसे; ३४५ कोटी मंजूर

SCROLL FOR NEXT