Elcid Investment Share Saam Tv
बिझनेस

Elcid Investment Share: ३ रुपयांच्या शेअरची किंमत २४ तासात झाली २.६० लाख रुपये; कोणत्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल? वाचा

Elcid Investment Share Price Hike: मंगळवारी शेअर मार्केटमध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळाली. एल्सिड या कंपनीच्या स्टॉक ६७ लाख टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Siddhi Hande

दिवाळीच्या मूहूर्तावर अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. काहीजण प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात तर काहीजण सोने खरेदी करतात. तसेच काहीजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे खूप जास्त जोखमीचे असते. परंतु सध्या एका शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट या शेअरने खूप मोठी झेप घेतली आहे. एल्सिड इन्व्हेसटमेंटचा शेअर हा देशातील सर्वात महागडा शेअर बनला आहे. हा शेअर एमआरएफच्या शेअर्सच्या दुप्पट झाला आहे. (Share Market)

बीएसईच्या आकड्यांनुसार, जर कोणत्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये १ लाख रुपये लावले असतील तर तो व्यक्ती अब्जाधीश झाला आहे. १ लाख रुपयांचे रुपांतर ६७० कोटींमध्ये झाली आहे. या शेअरची किंमती किती होती?शेअरमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली ते जाणून घेऊया.

मंगळवारी एल्सिड सोल्युशन्सच्या शेअरने मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली. एकाच दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ६७ लाख टक्क्यांनी वाढ झालीआहे. त्यानंतर ३.५३ रुपयांच्या शेअरची किंमत २.३६ लाख रुपये झाली. शेअर मार्केटच्या इतिहासात एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमती एवढी वाढते हे क्वचितच होते.

१ लाख गुंतवले तर त्याचे ६७० कोटी झाले (Elcid Investment Share Price Hike)

जर गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे ६७० कोटी झाले. जर एखाद्या गुंतवणूकदाराने ३.५३ रुपये प्रति शेअर या दराने १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्या व्यक्तीकडे २८,३२९ शेअर्स असतील. या कंपनीच्या एका शेअरची किंमत २.३६ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे ६७० कोटी रुपये झाले असतीव.

Elcid कंपनी काय करते? (What Does Elcid Company Do)

Elcid Investment Limited ही नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी एशियन पेंट्स लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपचादेखील भाग आहे. एशियन पेंट्स सुरु करणाऱ्यांमध्ये ४ हिस्सा या कंपनीचा आहे. या कंपनीच्या शेअरने काल मार्केटमध्ये मोठी झेप घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT