ECGC PO Recruitment Saam tv
बिझनेस

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

ECGC PO Recruitment 2025: ईसीजीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

ECGC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय निर्यात क्रेडिट गॅरंटी निगम म्हणजेच ECGC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सध्या प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ECGC ही एक सरकारी कंपनी आहे. या कंपनीत ऑफिसर होण्याची संधी तुमच्याकडे आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.ecgc.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर आहे. ६ ते ७ डिसेंरपर्यंत अर्ज शुल्क भरु शकतात.

या नोकरीसाठी २१ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु कतात. या नोकरीसाठी अर्ज करताना राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ईसीजीसीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत इतर निकषांमध्येही उमेदवार बसायला हवेत.

निवडप्रकिया (Application Process)

ईसीजीसीमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, जनरल नॉलेज आणि Quantitave Aptitude परीक्षा होणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावर तुम्हाला मुलाखतीला बोलावले जाणार आहे.

अर्ज कसा करावा? (Apply Now)

सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवरील अप्लाय लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरुन नोंदणी पूर्ण करायची आहे.

यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.

फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एकदा नीट भरला आहे की नाही हे बघून घ्या. यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : अजित पवारांचा फायरब्रँड नेता धडाडणार! आधी प्रवक्ते पदावरून हटवलं, पण ४८ तासात स्टार प्रचारकाच्या यादीत

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Childrens Day: बाल दिवस १४ नोव्हेंबरलाच का साजरा करतात? खूप कमी लोकांना माहिती आहेत या इंटरेस्टिंग गोष्टी...

Vastu Shastra: संध्याकाळी 'या' वेळेत घरात प्रवेश करते देवी लक्ष्मी; ही खास कामं जरूर करा

Maharashtra Politics: NCP च्या स्टार प्रचारकांच्या यादीत छगन भुजबळांना स्थान नाही, धनंजय मुंडेंचे नाव ५ व्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT