Ayodhya   Saam Tv
बिझनेस

Ram Mandir: ईस्ट असो की वेस्ट, देशाच्या कोणत्याही भागातून पोहोचता येईल अयोध्येत; नवीन हवाई मार्ग सुरू

New Air Routes : अयोध्येला जाणाऱ्यांना १ फेब्रुवारीपासून नवी भेट मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने अयोध्येसाठी ८ नवीन उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतलाय. ही उड्डाणे मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूरसह अनेक मार्गांवर चालतील. यात्रेकरूंच्या सुविधा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय.

Bharat Jadhav

New 8 Air Routes To Reach Ayodhya :

सध्या अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील भाविक सर्व अयोध्येला जात आहेत. दरम्यान नागरी उड्डाण मंत्रालयाने अयोध्याला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय. अयोध्येला जाणाऱ्यांना १ फेब्रुवारीपासून नवी भेट मिळणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने अयोध्येसाठी ८ नवीन उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतलाय.(Latest News)

ही उड्डाणे मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूरसह अनेक मार्गांवर चालतील. यात्रेकरूंच्या सुविधा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. २३ जानेवारीपासून मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून आतापर्यंत सुमारे १९ लाख भाविकांनी अयोध्येत रामाचे दर्शन घेतले आहे. दररोज २ लाखांहून अधिक राम भक्त सहजपणे श्री रामलल्लाच्या दरबारात पोहोचून दर्शन आणि पूजा करत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२३ जानेवारीला ५ लाख, २४ जानेवारीला २.५ लाख, २५ जानेवारीला २ लाख, २६ जानेवारीला ३.५ लाख, २७ जानेवारीला ३.२५ लाख भाविक आणि ३.२५ लाख भाविक २८ जानेवारीला अयोध्येत पोहोचले होते. भाविकांची गर्दी पाहता नागरी उड्डाण मंत्रालयाने देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातील भाविकांना अयोध्येत कसा आणता येईल याचा विचार करत आहे. त्या विचाराच्या दृष्टीने नवीन आठ उड्डाणे चालू करण्यात आली आहेत.

सिव्हिल एव्हिएशनने बंगळुरू, मुंबई, दरभंगा, पाटणा, जयपूर, अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्लीसह अनेक मार्गांवर उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत दर्शनासाठी लोकांची मोठी रांग लागलीय. दिल्ली ते अयोध्येपर्यंतचे भाडे ३५०० ते ३८०० रुपये आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून तुम्ही सहज तिकीट बुक करू शकता. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते या विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान अयोध्या धाममधील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ३५० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे -बंगळुरू महामार्गावर भयंकर अपघात, कंटेनरची एकमेकांना धडक

Yami Gautam: कॉन्ट्रास्ट फॅशनचा नवा ट्रेंड, कश्मिरी ब्यूटी यामी गौतमचा पिंक ड्रेस लूक व्हायरल, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT