Air India : सेफ्टीमध्ये कमतरता ठेवणं एअर इंडियाला पडलं भारी; भरावा लागला १.१ कोटी रुपयांचा दंड

Air India : नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइन्सचे एक कर्मचारीने तक्रार केली होती. एअरलाइन्स लांब पल्ल्याच्या अंतरासाठी कोणतेच नियम पाळत नव्हती. कंपनी सेफ्टी नियमांचे पालन करत नव्हती, अशी तक्रार करण्यात आली होती.
Air India
Air India ANI
Published On

DGCA Fined To Air India:

सुरक्षा नियम उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियावर १.१ कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय. विमान वाहतूक नियामक प्राधिकरण नागरी विमान वाहतूक महासंचालक यांनी एअरलाइन्सवर हा दंड ठोठवला. एअर इंडिया एअरलाइन्सवर एकाच आठवड्यात दोनदा कारवाई झालीय. याआधी रनवेवर धुकं असताना एअरलाइन्सने चांगली प्रकारे तयारी केली नव्हती. याप्रकरणी नियमाक मंडळाने एअरलाइन्सवर ३० लाख रुपयांचा दंड ठोठवला होता.(Latest News)

नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइन्सचे एक कर्मचारीने तक्रार केली होती. एअरलाइन्स लांब पल्ल्याच्या अंतरासाठी कोणतेच नियम पाळत नव्हती. कंपनी सेफ्टी नियमांचे पालन करत नव्हती, अशी तक्रार करण्यात आली होती. एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी ठरवण्यात आलेल्या मानकांचे पालन एअरलाइनकडून करण्यात येत नव्हते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे ज्या रुटवर या नियमांचे उल्लंघन होत आहे, ते मार्ग सर्वाधिक संवदेनशील मार्ग आहेत. या तक्रारीवरून डीजीसीएने केस नोंदली आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.त्यानंतर एअरलाइन दोषी आढळल्याने विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाने विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर एअरलाइनकडून देण्यात आलेले उत्तर हे समाधानकारक नसल्याने कंपनीला दोषी ठरवण्यात आले. त्यानुसार एअरलाइन्सला १.१ कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव तक्रारदाराचे नाव उघड करण्यात आलेले नाही. याआधी १७ जानेवारीलाही एअर इंडियावर कारवाई झाली होती. धुक्यात उड्डाणांसाठी पुरेशी व्यवस्था न केल्याबद्दल एअरलाइन्सवर ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याशिवाय इंडिगो एअरलाईनला १.२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवाशांचा धावपट्टीवर बसून जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Air India
Plane Crash: युक्रेनियन कैद्यांना घेऊन जाणारं रशियन लष्करी विमान कोसळलं, ६५ जण ठार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com