Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: १-२ तासांच्या कामाने करता येईल लाखोंची कमाई, लाडक्या बहिणीला मिळालेले पैसे 'या' बिझनेसमध्ये गुंतवा

Ladki Bahin Yojana Business Idea: लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैसे वाचवून तुम्ही अजून पैसेही कमावू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत अनेक महिलांना याचा लाभ मिळालाय. मात्र हे मिळालेले पैसे वाचवून तुम्ही अजून पैसेही कमावू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे गुंतवून अजून पैसै कमावू शकता.

मुळात हे काम तुम्हाला दिवसातून केवळ १-२ तास करावं लागणार आहे. तुम्हाला काही व्यवसाय करायचा असेल पण तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नसतील तरीही चालणार आहे. हा छोटा बिझनेस आहे डेकोरेशनचा. आजकाल वाढदिवसापासून ते छोट्या-मोठ्या फंक्शन्समध्ये सजावट केली जाते. केवळ मोठ्या शहरांमध्येच नाही तर लहान शहरांमध्येही हा ट्रेंड आहे. अशा स्थितीत डेकोरेशनचा बिझनेस मार्केटमध्ये बराच मोठा आहे.

असा सुरू करा बिझनेस

तुम्ही हा बिझनेस मोठ्या आणि लहान दोन्ही स्तरावर सुरू करू शकता. मोठ्या स्तरावर काम करण्यासाठी तुम्हाला निश्चितपणे एक मोठी टीम आणि जास्त गुंतवणूकीची आवश्यकता भासणार आहे. मात्र हे काम तुम्ही 10,000 रुपये खर्चून छोट्या प्रमाणावर सुरू करू शकता. यासाठी, तुम्ही एखादे छोटं दुकान उभारून किंवा वेबसाइट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ऑर्डर घेऊ शकता.

इंटरनेटवर उपलब्ध असलेले पोर्टफोलिओ पाहून तुम्ही डेकोरेशन पद्धती शिकू शकता. तुम्ही ते यूट्यूबवर पाहून फ्रीमध्ये शिकू शकता. सुरुवातीला तुम्हाला हॉल किंवा खोली सजवण्यासाठी वेळ लागू शकतो. पण, नंतर तुम्ही हे काम फक्त १ किंवा २ तासात पूर्ण कराल.

काय-काय सामनाची लागेल गरज?

डोकेरेशनच्या कामासाठी साधारपणे रंगीबेरंगी फुलं, पानं, फुगे, लीड मोटीफ लाइट्स, ट्री लाइट्स आणि रिबन इत्यादींची आवश्यकता असते. या सर्व गोष्टींसाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. या गोष्टी बाजारात स्वस्त दरात उपलब्ध आहेत. यापैकी अनेक गोष्टी तुम्ही नंतरही पुन्हा वापरू शकता.

किती होणार कमाई?

ऑर्डर मिळाल्यावर डेकोरेशनचा बिझनेस जलद कमाई करू सखतो. यामध्ये खर्चापेक्षा नफा जास्त असतो. संपूर्ण खर्च वजा करूनही तुम्ही 35-40 टक्के रक्कम वाचवता येते. अशा परिस्थितीत कमाई खूप जास्त असते. जर तुम्हाला लग्नासारखी मोठी फंक्शन्स मिळू लागली तर तुम्ही सहज लाखोंची कमाई करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Moon 2025: आज भारतात दिसणार खग्रास चंद्रग्रहण; ब्लड मूनची अद्भुत दृश्यं पाहण्याची संधी

Baaghi 4 vs The Bengal Files : टायगर श्रॉफ की पल्लवी जोशी वीकेंडला कोणी मारली बाजी? 'बागी ४'नं शनिवारी कमावले 'इतके' कोटी

Small Business Tips: Small Business सुरू करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी बनवा

Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

SCROLL FOR NEXT