Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ९ वर्षांची मेहनत, ८ वेळा अपयश, लग्नासाठी दबाव; कठीण परिस्थितीवर मात करत केली MPPSC क्रॅक; DSP मयंका चौरसिया यांचा प्रवास

Success Story of DSP Mayanka Chaurasia: डीएसपी मयंका चौरसिया यांनी ९व्या प्रयत्नात MPPSC परीक्षा पास केली. त्यांना ८ वेळा अपयश आले परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या प्रयत्नाचे यश त्यांना मिळाले.

Siddhi Hande

डीएसपी मयंका चौरसिया यांचा प्रेरणादायी प्रवास

सलग ८ वेळा अपयश

शेवटी ९ वर्षाच्या मेहनतीनंतर MPPSC परीक्षा पास

अपयश ही यशाची पहिली पायरी असते. परंतु जर सतत अपयश येत असेल तर खूप दुःख होते. अनेकदा आपले स्वप्न बाजूला ठेवून काहीतरी दुसरं करायची इच्छा होते. परंतु कितीही काही झालं तरीही हार मानायची नसते. तुम्हाला भविष्यात नक्कीच यश मिळेल. अशीच आशा मयंका चौरसिया यांनी ठेवली. सलग ८ वेळा स्पर्धा परीक्षेत अपयस आलं तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले.

मयंका चौरसिया या मूळच्या छतरपूरच्या रहिवासी. त्यांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. त्यांनी ८ वेळा मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. परीक्षेसाठी त्यांनी अनेक त्याग केला. परंतु शेवटी आपले स्वप्न सत्यात उतरवून दाखवलेच.

मयंका यांचा डीएसपीपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात त्यांना अनेकजणांचे टोमणे ऐकावे लागले. त्रास सहन करावा लागला, त्यात नेहमी अपयश आल्याने त्या अजूनच खचल्या होत्या. परंतु आपल्या स्वप्नांना त्यांनी कधीच हरु दिले नाही. त्यांनी नवव्या प्रयत्नात शेवटी स्पर्धा परीक्षा पास केली.

सलग ८ वेळा स्पर्धा परीक्षेत अपयश

मयंका यांनी भोपाळ येथील बंसल कॉलेजमधून इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांचे लक्ष्य सिविल सर्व्हिस होते. त्यांनी २०१६ मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. सुरुवातीला त्यांना प्रिलियम्स परीक्षेत यश मिळाले परंतु मेन्समध्ये त्यांना अपयश आले. परंतु त्यांनी मेहनत सुरु ठेवली. त्यांच्या कुटुंबाने त्यांची खूप साथ दिली.

२०१९ आणि २०२० मध्ये त्या इंटरव्ह्यूपर्यंत पोहचल्या होत्या परंतु त्यांना यश मिळाले नाही.२०२१ मध्ये तब्येत बरी नसल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. परंतु त्यांनी हार मानली नाही.

लग्न कर म्हणून दबाव

मयंका यांना या काळात अनेक लोकांचे टोमणे ऐकावे लागले. त्यांना लग्न करण्यास सांगितले. परंतु त्यांनी सांगितले की, मी लग्न तेव्हाच करेन जेव्हा माझ्या मंडपाबाहेर लाल बत्तीची गाडी उभी असेल. सिलेक्शन होईपर्यंत लग्न करणार नाही असं त्यांनी सांगितले.

९ वर्षानंतर मिळवली वर्दी

मयंका यांनी ८ वेळा मेन्स परीक्षा दिली. त्यातील ३ इंटरव्ह्यूमध्ये त्या अपयशी ठरल्या. शेवटी नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. ९ वर्ष वाट पाहिल्यानंतर त्यांना हे यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs: लग्नासाठी ब्लाऊज शिवताय? मग हे 5 ट्रेडिंग पॅटर्न नक्की ट्राय करा

Rohit Sharma: हिटमॅन नाही आता ‘डॉक्टर’ रोहित शर्मा! भारताच्या माजी कर्णधाराला मानद डॉक्टरेट

Pune Accident: पुण्यात भयंकर अपघात! ५ वर्षांच्या चिमुकल्याला भरधाव कारने चिरडलं, थरारक VIDEO व्हायरल

Buldhana Accident : धावत्या बसचा अचानक ब्रेक फेल झाला, ३० प्रवाशांचा जीव टांगणीला ; चालकाने थेट...

Maharashtra Live News Update: महाड नगर परिषद राडा प्रकरण, विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण

SCROLL FOR NEXT