Donald Trump  Saam Tv
बिझनेस

Donald Trump: ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका! टॅरिफमध्ये २६ टक्क्यांनी वाढ; तेल, फोन,सोन्याच्या किंमती महागणार

Donald Trump Increase Tarrifs On India: अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने जगभरातील सर्व देशांवर आयात कर वाढवला आहे. अमेरिकेने भारताच्या टॅरिफमध्ये २६ टक्क्यांनी वाढ केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल मोठी घोषणा केली. त्यांनी बुधवारी रात्री भारतावर २६ टक्के टॅरिफ कर लावला आहे. त्यांनी सर्व देशांवर हा कर लावण्याचा निर्णय घेतला. यात भारताचेही नाव आहे. टॅरिफ कर म्हणजे समन्यायी कर (आयात कर). भारत त्या वस्तू अमेरिकेकडून आयात करतो त्यावर हा कर लागणार आहे.

टॅरिफ कर म्हणजे भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर आता कर लावला जाणार आहे. २६ टक्के कर आकारला जाणार आहे. रेसिप्रोकल टॅरिफ फक्त भारतावर नाही तर जगभरातील सर्व देशांवर लावण्यात आला आहे. भारतावर २६ टक्के तर चीनवर ३४ टक्के आयात कर लागू करण्यात आला आहे. याचे पडसाद शेअर मार्केटवरही पाहायला मिळाले.

याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की,भारताबाबत कठीण (निर्णय घेणं) होतं, पंतप्रधान मोदी माझे अगदी चांगले मित्र आहेत, पण मी त्यांना सांगितलं, 'तुम्ही आमच्याशी नीट वागला(शुल्काबाबत) नाहीत," असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर "सवलतीचं"26% आयात शुल्क जाहीर करताना म्हटलं.

अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका जगभरात बसणार आहे. यामध्ये चीनवर ३४ टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. युरोपियन युनियनवर २० टक्के, व्हिएतनामवर ४६ टक्के,दक्षिण कोरिया २५ टक्के, जपान २४ टक्के, तैवान ३२ टक्के, युके १० टक्के कर लावण्यात आला आहे.

अमेरिकेच्या निर्णयाचा परिणाम

निर्यातीत घट होण्याची शक्यता आहे. आयात शुल्क वाढल्याने निर्यात कमी होऊ शकते.भारतातून अमेरिकेत कपडे, औषधे, टेक्निकल सेवा, रासायनिक उत्पादने निर्यात होतात.निर्यात घटल्याने संबंधित क्षेत्रावर परिणाम होऊ शकते.

भारत अमेरिकेकडून तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादने आयात करतो. जर भारताने आयात शुल्क वाढवले तर संबंधित गोष्टींच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

या गोष्टींवर आयात शुल्क नाही

सोनं, प्लॅटिनम, व्हिटामिन, इन्सुलिन, स्टील आणि कागद या गोष्टींवर आयात शुल्क आकारले गेले नाही.

जर आयात शुल्क वाढले तर त्याचा परिणाम इंधन उत्पादनावर होतो. जागतिक बाजारपेठेत तेल उत्पादन कमी होते. परिणामी तेल महाग होऊ शकते. सोन्यावर आयात शुल्क न लागल्याने कदाचित गुंतवणूक वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

Gopichand Padalkar : जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर...; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले

CMF Headphones Pro: 100 तास प्लेबॅकसह नवीन CMF वायरलेस हेडफोन लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT