LPG Gas cylinders Price Rate Latest News : इराण-इस्त्राइल आणि अमेरिका युद्धाच्या झळा आता भारतामध्ये बसण्यास सुरूवात झाली आहे. युद्धामुळे भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (LPG cylinders Price) दरात मोठी वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६० रूपयांनी वाढले आहेत. तर १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची (commercial LPG cylinder Price) किंमत ११५ रूपयांची वाढ (LPG Gas Cylinders Rates) झाली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह देशभरात नवे दर आजपासून लागू झाले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायिक आस्थापनांसारख्या व्यवसायांवर गॅस दरवाढीचा परिणाम झाला आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी दिल्लीमध्ये १४.२ किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८५३ रूपयांवरून ९१३ रूपये इतकी झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचे दर ८५२.५० रूपयांवरून ९१२.५० रूपये इतकी झाली आहे. कोलकात्यामध्ये सिलिंडरचे दर ३० रूपयांने वाढले आहेत. तर चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरचे दर ८६८.५० रूपयांहून ९२८.५० रूपये इतकी झाली आहे. एप्रिल २०२५ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता, दर स्थिर होते. वर्षभरानंतर एलपीजी सिलिंडरचे दर बदलले आहेत.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत व्यावसायिक सिलिंडरचे दर ११५ रूपयांने वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७६८.५० रुपयांवरून १८८३ रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७२०.५० रुपयांवरून १८३५ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत १८७५.५० रुपयांवरून १९९० रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये ती १९२९ रुपयांवरून २०४३.५० रुपये इतकी झाली आहे.
इराण-इस्त्राइल युद्धामुळे भारतामधील ऊर्जा पुरवठा आणि इंधनाच्या पुरवठ्यावर देशात चर्चा सुरू असतानाच दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे. देशात ऊर्जेची कमतरता नाही, ग्राहकांनी पुरवठा सुरळीत सुरू राहील, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आश्वासन दिले.
भारतात ऊर्जेची कमतरता नाही आणि आमच्या ऊर्जा ग्राहकांसाठी काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असे हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये महटलेय. दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेही देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याचे सोशल मीडियावर पसरणारे वृत्त चुकीचं असल्याचे म्हणत फेटाळले. भारतात पुरेसा इंधन साठा आहे आणि पुरवठा आणि वितरण नेटवर्क सामान्यपणे कार्यरत आहेत. इंडियन ऑइल देशभरात अखंड इंधन पुरवठा राखण्यासाठी वचनबद्ध आहे. नागरिकांना घाबरू नये. इंधनासाठी पंपांवर गर्दी करू नये असे एका कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.