अलीकडेच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. यानंतर आता त्यांचं मृत्यूपत्राबद्दल माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या जर्मन शेफर्ड कुत्रा टिटो याची संपूर्ण काळजी घेतली जाईल, याची तरतूद केली आहे. रतन टाटा यांनी आपल्यामागे 10 हजार कोटींहून अधिक संपत्ती सोडली आहे.
ही संपत्ती त्याच्या बहिणी शिरीन आणि डायना यांच्यामध्ये विभागली जाईल. याशिवाय घरातील कर्मचारी आणि इतरांमध्येही याचा काही वाट देण्यात येणार आहे. मात्र रतन टाटा यांच्या कुत्र्याला जेवढी संपत्ती मिळणार आहे, त्यानंतर तो किमान भारतातील सर्वात श्रीमंत कुत्रा बनेल. रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात त्यांचा खास मित्र शंतनूचाही उल्लेख आहे.
रतन टाटा यांनी टिटोला पाच-सहा वर्षांपूर्वी दत्तक घेतलं होतं. रतन टाटा यांच्या इच्छेनुसार, टिटोची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांचे स्वयंपाकी राज शॉ यांच्याकडे असेल. गेल्या तीस वर्षांपासून रतन टाटा यांचे घरगडी असलेले सुबैया यांच्यासाठी त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात तरतूद केली आहे. टाटा जेव्हाही परदेशात जायचे तेव्हा ते रंजन आणि सुबैयांसाठी डिझायनर कपडे खरेदी करायचे.
रतन टाटा यांनी त्यांचा जर्मन शेफर्ड कुत्रा टिटोची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांचा स्वयंपाकी राजन शॉ यांच्यावर सोपवली आहे. त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी टिटोच्या काळजीसाठी बरीच रक्कम सोडली आहे.
रतन टाटा यांनी त्यांचे सहकारी शंतनू नायडू यांचाही त्यांच्या मृत्यूपत्रात समावेश केला आहे. टाटा यांनी आरएनटी कार्यालयातील महाव्यवस्थापक नायडू यांचा उपक्रम असलेल्या गुडफेलोमधील आपला हिस्सा सोडला आहे. नायडूंच्या शिक्षणासाठीचे कर्जही त्यांनी माफ केले आहे. 'गुडफेलो' ही 2022 मध्ये सुरू झालेली ज्येष्ठ नागरिकांसाठी सबस्क्रिप्शन-आधारित सहचर सेवा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.