Home Loan  Saam Tv
बिझनेस

Womens Day Special : गृहकर्ज महिलांच्या नावे घेण्याचे अनेक फायदे, तुम्हाला माहितीयेत का?

Home Loan:भारतात महिलांना त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी देण्यात येणाऱ्या गृहकर्जा विषयीच्या इतर अनेक महत्त्वपूर्ण बाबी आहेत,

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Home Loan

सध्याच्या काळात प्रत्येक देशातील स्त्रीया या जास्तीत जास्त आर्थिकदृष्या स्वावलंबी होत आहेत. त्यामुळे पुरुषांसोबत प्रत्येक स्त्रीला स्वत:चं घर असावं असा वाटंत,यासाठी त्या धडपड करत असतात,त्यासाठी काही महिला घराचं स्वप्न (Dream)पूर्ण करण्यासाठी अनेक गृहकर्जाची मदत घेतात. त्यातील खास गोष्ट म्हणजे महिलांना गृहकर्जाचे मिळण्याच्या शक्यता अधिक असून त्याचे फायदेही मिळू शकतात. आपल्या भारतात महिलांना त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी देण्यात येणाऱ्या गृहकर्जा विषयीच्या इतर अनेक महत्त्वपूर्ण बाबी आहेत,त्या प्रत्येक महिलेने जाणून घेण गरजेच आहे.

गृहकर्जाचा दर

भारतात कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्तसंस्थांसाठी महिला या अधिक विश्वासार्ह कर्जदार मानल्या जातात. त्यामूळेच महिलांना आकारण्यात येणारा येणारा गृहकर्जा दर हा बाजारात उपलब्ध असलेल्या व्याजदरांपेक्षा काही प्रमाणात कमी आहे. यामुळे महिलांना गृहकर्जाच्या मासिक हप्त्याची रक्कम कमी होते त्यामुळेच गृहकर्जाचे ओझं कमी होतं. या गृहकर्जाच अनेक फायदेही महिलांना मिळतात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिला अर्जदारांना प्राधान्य

प्रत्येक वर्षी दिले जाणाऱ्या गृहकर्जाची व्यवस्थित परतफेड करणाऱ्यांपैकी असे दिसून आले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिला कर्जदार कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळेच महिला कर्जदारांना अर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक असते. साधारणपणे महिला या पुरूषांच्या तुलनेत अनावश्यक खर्च टाळतात त्यामुळे अधिक बचत महिला करतात तसेच घरगुती खर्चांचंही अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करतात या गोष्टींचा विचार करुन कर्जदात्या बँका आणि वित्तसंस्था महिलांना कर्ज (Loan)देण्यासा विशेष उत्सुक असल्याचे दिसून येते.

वैयक्तिक गृहकर्ज योजना

भारतात लहान मुलीपासून ते वृद्ध महिलेपर्यंतचा विचार करतात अनेक योजना आहेत. त्यात गृहकर्जाचा विचार करता अनेक कर्जदात्या बँका आणि गृहवित्त संस्था महिला कर्जदारांसाठी अनुकूल अटींचा विचार करुन गृहकर्ज योजना तयार करत आहेत,त्यात दीर्घ मुदत तसेच कमीत कमी अटी, कमी व्याजदर या बाबींचा समावेश आहे. या कर्जयोजनांमुळे महिलांच्या घरखरेदीती प्रक्रिया अधिक सोपी बनण्यास मदत होते.

आयकर सवलत

घर खरेदी केल्यानंतर प्रत्येक पुरुष आणि महिला गृहकर्जाची परतफेड करणारे आयकर सवलतीचा लाभास पात्र आहेत. गृहकर्जात मुदलाच्या परतफेडीवर साधारण दीड लाख रुपयांची कर सवलत मिळते आणि व्याजाच्या परतफेडीवर दोन लाख रुपयांची कर सवलत मिळते. विशेष म्हणजे पती आणि पत्नीने असं दोघांनी मिळून संयुक्त गृहकर्ज घेतलं तर दोघेही प्रत्येकी साडेतीन लाख रुपयांची आयकर सवलत मिळवण्यास पात्र ठरतात.

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजनेचे अनेक लाभार्थी आहेत. या योजनेत घर खरेदी करताना सुमारे २.६७ लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळते मात्र त्यासाठी महिला एकटी किंवा संयुक्तरित्या त्या घराची मालक असावी. प्रधानमंत्री आवास योजनेत अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्या दुर्बल घटक प्रवर्गात समावेश असलेल्या विधवा महिला आणि एकट्या महिलांना प्राधान्य देण्यात येते.

कमी मुद्रांक शुल्क

आपल्या देशातील काही राज्यांमध्ये गृहखरेदी करणाऱ्या महिलांना मुद्रांक शुल्कात साधारण एक ते दोन टक्क्यांनी सवलत मिळते. या सवलतीमुळे पन्नास लाख रुपये किमतीचं घर खरेदी केलं तर महिलांनी पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. महाराष्ट्रात महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्क्यांची सूट मिळते

विकासकांकडून विशेष सूट

अनेकवेळा विकसक म्हणजेत बिल्डरकडून महिला गृहखरेदीदारांना विविध प्रकारच्या विशेष सवलती आणि सूट मिळतात. किमान बुकिंग अमाऊण्ट तसेत अनुदान योजना ,नोंदणी आणि मुद्रांक शुल्क माफी या बाबींना विशेष सवलती विकासक महिला गृहखरेदीदांना देतात. या सवलतींचा लाभ फक्त कमावत्या महिलांना नाही तर काम न करणाऱ्या महिला आणि गृहिणीसुद्धा घेऊ शकतात मात्र त्यासाठी त्यांचा सहअर्जदार कमावता असायला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT