Muhurat Trading Saam Tv
बिझनेस

Muhurat Trading 2024: शेअर बाजारावर लक्ष्मी प्रसन्न, मुहूर्त ट्रेडिंगवर सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची घेतली उसळी

Share Market Today : मुहूर्त ट्रेडिंगवर सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची उसळी घेतली असून निफ्टी 150 अंकांनी वाढून 24,368 अंकांच्या पातळीवर पोहोचला आहे.

Satish Kengar

मुहूर्त ट्रेडिंगचा दिवस शेअर मार्केटसाठी खूपच शुभ ठरला हे. आज मुहूर्त ट्रेडिंगसाठी बाजारात उघडताच सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची उसळी घेतली आणि पुन्हा एकदा 80 हजारांचा टप्पा पार केला. तसेच निफ्टी 150 अंकांनी वाढून 24,368 अंकांच्या पातळीवर पोहोचला.

बीएसई निर्देशांकातील सर्व 30 शेअर्स ग्रीन झोनमध्ये ट्रेडिंग करताना दिसले. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, ॲक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह आणि कोटक बँक यांचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक वाढले. याशिवाय टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स सारखे शेअर्सही ग्रीन झोनमध्ये दिसले.

मुहूर्त ट्रेडिंग मणजे काय?

मुहूर्त ट्रेडिंग ही एक जुनी परंपरा आहे, जी गेल्या 68 वर्षांपासून शेअर बाजारात पाळली जात आहे. ही एक प्रतिकात्मक ट्रेडिंग असते. कोणतीही नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला मानाला जातो. या काळात गुंवणूकदार धार्मिकदृष्ट्या शगुन म्हणून काही प्रमाणात शेअर्स खरेदी करतात.

दरम्यान, शनिवार आणि रविवार शेअर बाजार बंद राहणार असून ट्रेडिंग पुन्हा सोमवारपासून सुरु होणार. यातच शुक्रवारही दिवसभर शेअर बाजार बंद होते, मात्र मुहूर्त ट्रेडिंगसाठी बाजार काही वेळासाठी सुरु करण्यात आलं होतं.

याआधी गुरुवारीच्या शेअर बाजारच्या ट्रेडिंगबद्दल बोलायचं झालं तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स 553.12 अंकांनी घसरून 79,389.06 वर बंद झाला होता. ट्रेडिंगदरम्यान सेन्सेक्स 654.25 अंकांनी घसरून 79,287.93 अंकांवर आला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी 135.50 अंकांनी घसरून 24,205.35 वर पोहोचला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT