Diwali 2023 Fixed Deposit Scheme Saam Tv
बिझनेस

Diwali 2023 : दिवाळीचा बोनस Fixed Deposit करताना या चुका टाळा; अधिक फायदा होईल

Investment Tips : यंदाच्या दिवाळीत तुम्ही देखील तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी FD मध्ये गुंतवणूक करु शकता.

कोमल दामुद्रे

Fixed Deposite Investment :

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि समृद्धीचा सण. या काळात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. वर्षभर वाट पाहाणारे आपण बोनस मिळातच तो खर्च करतो.

खरेतर या काळात बोनस मिळाल्यानंतर अनेकजण तो योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याकडे लक्ष देतात. यंदाच्या दिवाळीत तुम्ही देखील तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करु शकता. FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला अनेक गोष्टी माहित असणे देखील गरजेचे आहे. सणासुदीच्या काळात गुंतवणूकीसाठी तुम्ही एफडीचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. व्याजदर

गुंतवणूक करताना बँक (Bank) किंवा वित्तीय संस्थेच्या एफडीवर दिले जाणारे व्याजदर लक्षात ठेवा. कोणती बँक जास्त व्याज देते आहे हे तपासा. प्रत्येक बँकेचा एफडी (FD) दर चेक करा. बजाज फायनान्स ८.६० टक्के वार्षिक व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना ८.३५ टक्के व्याज देत आहे.

2. कालावधी

एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कालावधी महत्त्वाचा असतो. साधारणपणे, अधिक वर्ष गुंतवणूक तितका जास्त व्याजदर. बहुतेक बँका १ ते ३ वर्षांच्या एफडीवर जास्त व्याज देतात.

3. रक्कम

प्रत्येक बँकेची एफडी रक्कम वेगळी असते. एफडीमध्ये गुंतवणूक करताना बँकेचे (Rules) नियम जाणून घ्या.

4. व्याज किती

व्याजाचे पैसे तिमाही किंवा वर्षभरात कसे मिळेल हे चेक करा. अनेक बँका मॅच्युरिटीवर एकत्रित व्याज देतात. अनेक बँका दरवर्षी व्याज देतात.

5. एफडी रिटर्न कॅल्क्युलेशन

एफडी रिटर्न कॅल्क्युलेशन हा एक चांगला पर्याय आहे. ज्याद्वारे तुम्हाला किती व्याज मिळतो हे कळेल.

6. इंटरेस्ट

एफडीवर मिळालेल्या व्याजावर किती कर आकारला जातो. हे आधी समजून घ्या, त्यानुसारच गुंतवणूक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Running Benefits: सकाळी धावण्याचे शरीरावर काय परिणाम होतो?

Psychological Fact : नजर लागण्यामागे दडलं आहे एक सायकॉलॉजिकल सत्य, आत्ताच जाणून घ्या

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Jio Recharge Plan: फक्त ८९५ रुपयांत मिळणार ३३६ दिवसांची सेवा, जिओने दिला ग्राहकांसाठी मोठा लाभ

Vidarbha News : शेतातून येताना पावसात अक्रीत घडलं, ३ महिलांच्या अंगावर वीज कोसळली, बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT