Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास, शेवटच्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अपर्णा रमेश यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Aparna Ramesh: अपर्णा रमेश यांनी शेवटच्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी दिवसा नोकरी करत रात्री अभ्यास केला होता.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षेत अनेकदा पहिल्यांदा यश मिळत नाही. परंतु खूप कमी तरुण पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालतात. परंतु कितीही वेळा अपयश आले तरीही हार न मानता प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतेच. असंच यश अपर्णा रमेश यांना मिळेल. त्यांनी त्यांच्या शेवटच्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story)

अपर्णा रमेश (Aparna Ramesh) या मूळच्या कर्नाटकच्या रहिवासी. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. अपर्णा यांनी नोकरी आणि शिक्षणात समतोल राखला. त्यांनी टाइम मॅनेजमेंट करुन यूपीएससी (UPSC) परीक्षेचा अभ्यास केला.

अपर्णा यांनी कोणत्याही प्रकारे स्वतः चे लक्ष विचलित होऊन दिले नाही. त्यांनी स्वतः चे लक्ष फक्त आणि फक्त अभ्यासावर केंद्रित केले. अपर्णा या सकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत अभ्यास करायच्या. त्यानंतर ऑफिसला जायच्या. ८ तास काम केल्यानंतर घरी येऊन त्या पुन्हा रात्री २ ते ३ तास अभ्यास करायच्या.

अपर्णा या सुट्टीच्या दिवशी तर ८ ते ९ तास अभ्यास करायच्या. त्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. २०२० हा स्पर्धा परीक्षा देण्याचा त्यांचा शेवटचा अटेंप्ट होता. जर त्यांनी ही परीक्षा क्रॅक केली नसती तर त्या आर्किटेक्ट कम अर्बन प्लान म्हणून काम करत असत्या.

अपर्णा यांनी अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांमधून अभ्यास केला. त्यांनी अनेक नोट्स काढल्या. त्यांनी रोज न्यूज काढल्या. त्यांनी रोजच्या घटनांवर लक्ष ठेवले. अपर्णा यांनी लेखी परीक्षेत १००४ पैकी ८२५ आणि पर्सनालिटी टेस्टमध्ये १७१ गुण मिळवले. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ३५ वी रँक (UPSC Rank) मिळवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT