Ladki Bahin Yojana saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Devandra Fadnavis On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत अनेक पुरुषांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. या पुरुषांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Siddhi Hande

  • लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली घोटाळा

  • लाडकी बहीण योजनेच्या १४ हजार पुरुषांनी घेतला लाभ

  • या पुरुषांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र यांचे निर्देश

लाडकी बहीण योजनेत अनेक घोटाळे झाले आहेत. दरम्यान, आता तर लाडकी बहीण योजनेत पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. जवळपास १४ हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे पुरुष लाभार्थी झालेच कसे? याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता या पुरुषांवरकारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी काय दिले निर्देश?

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्देश दिले आहेत, असं सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ कसा घेतला, सरकारची फसवणूक झाली असेल तर ही बाब गंभीर आहे. करावाई करा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसणारी एकही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, त्यामुळे पात्र नसलेल्या महिलांना लाभ मिळाला नाही पाहिजे याकडेही लक्ष दिले पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थ्यांच्या छाननीबाबत आणि विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी महिलांनी घेतला आहे, असं समोर आल्यास वसूली केली जाईल. २६ लाख लाभार्थी महिलांचा डेटा आम्हाला दिला आहे. आता त्यात अपात्र किती याची छाननी केली जात आहे.

पुरुषांनी लाभ घेतला, त्याच काय

जवळपास १४ हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, काही महिलांच्या नावे बँक खाती नसतील तर पुरुषांच्या नावाने असलेल्या खात्यात जमा झाल्याची शक्यता आहे. ही बाब आम्ही तपासून पाहत आहोत. दरम्यान, सरकारी कर्मचारी महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर वसुली केली जाईल, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीही स्पष्ट केले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली किती पुरुषांनी लाभ घेतला?

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली १४००० पेक्षा जास्त पुरुषांनी लाभ घेतला आहे.

पुरुष लाभार्थ्यांवर कारवाई होणार का?

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली ज्या पुरुषांनी लाभ घेतला आहे. त्या पुरुषांवर कारवाई करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.

एकूण किती लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळले?

लाडकी बहीण योजनेतून २६ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत, याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT