
लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिला अपात्र
निकषांबाहेर जाऊन लाभ घेतले असल्याचे समोर
पडताळणीमध्ये माहिती समोर
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतून जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यातून अपात्र महिलांना बाद करण्यात आले आहे.
५० लाख लाडक्या बहिणी अपात्र (Ladki Bahin Yojana 50 Lakh Women Ineligible)
पडताळणीनुसार, आतापर्यंत जवळपास ४० लाख २८ हजार महिला अपात्र ठरल्या आहेत. याचसोबत जवळपास १४ लाख महिला या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या योजनेत त्यांना फक्त ५०० रुपये हप्ता मिळतो. याचसोबत अनेक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत. तरीही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांच्या नावापुढे फायनान्शियल स्ट्राँग कडिशन अशा शेरा मारुन लाभ बंद करण्यात आला आहे.
पडताळणी प्रोसेस
लाडकी बहीण योजनेत विधानसभा निवडणूकीपूर्वी महिलांना सरसकट लाभ देण्यात आला. या महिलांना काही महिने लाभ मिळाला. मात्र, यातील अनेक महिला अपात्र असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाच महिन्यात पडताळणी करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतले आहे.
या महिलांचे लाभ केले बंद (These Women Will not Get Benefit Of Ladki Bahin Yojana)
या योजनेत अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली तर १४ हजार २९८ पुरुषांनी लाभ घेतला आहे. २२८९ सरकारी महिला, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ३२ लाख महिला, ६५ वर्षांपवरील १ लाख १० हजार महिला आणि एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी लाभ घेतला आहे, त्यातील चार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तसेच चारचाकी वाहन असलेल्या महिलांची संख्या सव्वा दोन लाख आहे. याचशिवाय ६० हजार महिलांना स्वतः हून लाभ नाकारला असल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण आकडेवरीनुसार, जवळपास ५० लाख महिलांचा लाभ बंद केला असल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यातील एकूण २.५९ कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेतील पडताळणी अजून सुरु आहे.
लाडकी बहीण योजनेत किती महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे?
लाडकी बहीण योजनेतून ५० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
अपात्र ठरण्यामागची कारणं काय आहेत?
उत्पन्नाच्या अटीत न बसणे, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणे, चारचाकी वाहन असणे, सरकारी नोकरी असणे, वय किंवा निकषात बसत नसणे ही प्रमुख कारणं आहेत.
योजनेचा लाभ किती महिलांनी घेतला होता?
सुमारे २.५९ कोटी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामधून अपात्र महिलांची छाननी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.