DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात वाढ; १७०० कोटी मंजूर

Maharashtra Government Employees DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आला आहे.

Siddhi Hande

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

महागाई भत्ता २ टक्क्यांनी वाढला

जुलैपासून हा महागाई भत्ता लागू होणार आहे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यात वाढ दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होईल. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.

महागाई भत्ता किती झाला? (Dearness Allowance For Maharashtra Government Employees)

राज्य सरकारने महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर आता महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरुन ५५ टक्क्यांवर झाला आहे. यासाठी १७०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लागू करण्याचे धोरण आहे. त्यानुसार वर्षभरात दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. मागच्या वेळी १ जानेवारी २०२५ रोजी महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर आता जुलै महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढतो. सहा महिन्यांच्या कालावधीतील थकीत महागाई भत्त्यासह वाढीव भत्ता ऑगस्टच्या पगारात दिला जाईल. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. जवळपास १२ लाख कर्मचारी आहेत त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवाआधीच कर्मचाऱ्यांना ऑगस्टचे वेतन दिले जाण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांचा वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढतो. मागच्या वेळी २ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढला त्यानंतर आता पुन्हा महागाई भत्ता वाढला आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पगारात हा महागाई भत्ता दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दारूच्या नशेत नवऱ्याचं भयंकर कृत्य, भरदिवसा बायकोवर कोयत्याने वार, दोन्ही हात कापले नंतर...

Siddharth Jadhav: चेहऱ्यावर क्रौर्य, नजरेत दरारा; 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' मध्ये सिद्धार्थ जाधवचा काळजात धडकी भरवणारा लूक

Sai Tamhankar Photos: सईला पाहून वातावरण तापलं, लेटेस्ट फोटो एकदा पाहाच

Maharashtra Live News Update: आदिवासी भगिनींकडून मंत्री भरत गोगावले यांना भाऊबीजेची ओवाळणी

Kalyan Crime News : ५० रुपये द्यायला नकार दिला, भरदिवसा नशेखोर तरुणाकडून दुकानदारावर चाकूहल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT