DA Hike 2026 meta ai
बिझनेस

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Central Government Employees : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जुलै २०२६ पासून डीएमध्ये ३ टक्के वाढ होण्याची शक्यता असून डीए ६३ टक्क्यांवर जाऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या जुलै महिन्यात लागू होणाऱ्या महागाई भत्त्याकडे (DA Hike) सर्वांचे लक्ष आहे. यामध्ये वर्षातून दोनदा बदल केले जातात. जानेवारी आणि जुलै महिन्यात हे बदल केले जातात. यासाठी सहा महिन्यांच्या AICPI-IW म्हणजेच ऑल इंडिया कन्झ्युमर इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्सच्या आकडेवारीचा आधार घेतला जातो.

जानेवारी २०२६ मध्ये DA मध्ये २ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा DA/DR ५८ टक्क्यांवरून ६० टक्के झाला. आता जुलैच्या सायकलमध्ये आणखी ३ टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ही वाढ झाल्यावर DA ६० टक्क्यांवरून ६३ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. मात्र, अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

कधी घोषणा होणार?


DA वाढीची घोषणा साधारणपणे दसरा किंवा दिवाळीच्या आसपास केली जाते. यंदा दिवाळी ८ नोव्हेंबर २०२६ रोजी असल्याने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचं म्हणजे, घोषणा उशिरा झाली तरी वाढीचा लाभ १ जुलै २०२६ पासून लागू होऊ शकतो. त्यामुळे जुलैपासून घोषणा होईपर्यंतच्या कालावधीतील थकबाकी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एरियरच्या स्वरुपात मिळण्याची शक्यता आहे. DA वाढीसोबतच आठव्या वेतन आयोगाच्या पुढील शिफारशींकडेही केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transfer: १८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस दलात मोठा मोठा फेरबदल

Maharashtra News Live Update: गडचिरोलीच्या अतिदुर्गम लष्कर, गोपणार गावांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

AC Vastu Tips: घरामध्ये एसी कोणत्या दिशेला असावा? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या

7 स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन अन् धक्काबुक्की; महापालिकेत गोंधळ

Maharashtra : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेली 'ही' ७ स्वर्गासारखी सुंदर गावे, सुट्टीत एकदा नक्की फिरून या

SCROLL FOR NEXT