Instamart LPG Delivery GOOGLE
बिझनेस

Instamart LPG delivery: 10 मिनिटांत घरात येईल सिलेंडर! HPCL LPG सिलेंडर कसा मागवाल?

LPG Home Delivery : Swiggy Instamart आणि HPCL यांच्या भागीदारीत बेंगळुरूमध्ये निवडक LPG सिलेंडर आता काही मिनिटांत घरपोच मिळणार आहेत. कोणते सिलेंडर उपलब्ध आहेत आणि ऑर्डर कशी करायची ते जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

ऑनलाइन किराणा, भाजीपाला आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंसोबत आता एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरही घरपोच मिळणार आहे. क्विक कॉमर्स क्षेत्रात पहिल्यांदाच Swiggy Instamart ने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत भागीदारी करून निवडक LPG सिलेंडरची जलद डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना काही मिनिटांतच अधिकृत HPCL गॅस सिलेंडर घरी मागवता येईल.

सध्या ही सेवा बेंगळुरू शहरातल्या Instamart च्या काही निवडक सेवा क्षेत्रांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. तर इतर शहरांमध्ये ही सुविधा कधी सुरू होणार याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रासोबत बाकीच्या राज्यांमध्येही ग्राहकांना या सेवेच्या विस्ताराची वाट पाहावी लागणार आहे.

Instamart वर कोणते LPG सिलेंडर उपलब्ध आहेत?

ग्राहकांना सध्या HP Navya १० किलो कंपोझिट LPG सिलेंडर आणि HPCL ५ किलो मेटल LPG सिलेंडर ऑर्डर करता येत आहेत. हे दोन्ही सिलेंडर लहान फॅमिली, विद्यार्थी, भाड्याने राहणारे किंवा कमी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

Instamart वरून LPG सिलेंडर कसा ऑर्डर कराल?

गॅस सिलेंडर ऑर्डर करण्याची प्रोसेस इतर वस्तूंसारखीच सोपी आहे. त्यासाठी Instamart अॅप उघडा. HPCL LPG सिलेंडर शोधा. तुम्हाला हवा तो सिलेंडर निवडा. आवश्यक माहिती भरून ऑर्डर पूर्ण करा. ही ऑर्डर Instamart वरून दिली असली तरी प्रत्यक्ष डिलीव्हरी HPCL च्या अधिकृत वितरकांमार्फत आणि प्रशिक्षित डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि सरकारी नियमांचे पूर्ण पालन केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT