Cumin seeds Price  Saam tv
बिझनेस

Cumin Seed Price: शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुललं हसू, सोन्याच्या भावात विकली जातेय बडिशेप आणि जिरे, कारण...

Cumin Seed Price: जिऱ्याच्या वाढत्या मागणीमुळे येणाऱ्या काही दिवसांत जिऱ्याचा दर ७० हजार रुपये होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Vishal Gangurde

Cumin Seed Price Rate: सोन्याच्या भावासारखी जिऱ्याच्या भावानेही उसळी घेतली आहे. राजस्थानच्या नागौर येथे जिऱ्याचा दर ६४ हजार रुपये प्रति क्विंटल इतका झाला आहे. जिऱ्याच्या वाढत्या मागणीमुळे येणाऱ्या काही दिवसांत जिऱ्याचा दर ७० हजार रुपये होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

जिऱ्याचे वाढते दर पाहता शेतकऱ्यांचे चेहरे फुलल्याचे पाहायला मिळाले आहेत. वाढत्या दरामुळे शेतकरी मोठा अपक्षेने जिरे बाजारात घेऊन येत आहेत.

जिऱ्याबरोबर ईसबगोल देखील २७ हजार १०० रुपये प्रति क्विंटल भावाने विकला जात आहे. तर दुसरीकडे बडीशेप देखील २८ हजार प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. बडिशेप आणि ईसबगोलची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे चांगले दिवस सुरू झाले असं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे देशभरात राजस्थानमधील नागौरच्या बाजारातील मूग आणि जिरे प्रसिद्ध आहे.

जिऱ्याची किंमत का वाढत आहे?

जिरे व्यापारी अखिलेश गढवार यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर जिऱ्याला प्रचंड मागणी आहे. यंदा अनिश्चिततेच्या वातावरणामुळे जिऱ्याच्या पिकाचं फार नुकसान झालं. त्यामुळे बाजारात योग्य प्रमाणात जिऱ्याची पुर्तता झाली नाही. त्यामुळे बाजारात उपलब्ध जिऱ्याची किंमत प्रचंड वाढली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून वाढत आहेत दर

एप्रिल महिन्यांपासून जिऱ्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. १२ एप्रिलपासून जिऱ्याचा दर ५० हजार पार गेला होता. आता या दोन महिन्यांत जिऱ्याचा दर ६० हजार रुपये पार गेला आहे. आता या जिऱ्याचा दर ७० हजार रुपये पार होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT