GST Council Meet Decision: ऑनलाइन गेम ते सिनेमागृहातील खाद्यपदार्थ अन् बरंच काही; काय स्वस्त, काय महाग, वाचा सविस्तर

GST On Online Gaming, Cinema Hall Foods: या बैठकीत ऑनलाईन गेमिंगचा जीएसटी दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासहित अन्य काही निर्णय घेण्यात आले आहे.
Cinema Hall
Cinema HallSaam Tv
Published On

New Delhi: जीएसटी परिषद ५० वी बैठक मंगळवारी पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय सूत्रांकडून याआधीच लोकांसमोर आले होते. या बैठकीत ऑनलाईन गेमिंगच्या कमाईवरील जीएसटी दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासहित अन्य काही निर्णय घेण्यात आले आहे . (Latest Marathi News)

कोणत्या वस्तूवरील दर वाढविण्यात आले आहेत?

जीएसटी दरात वाढ आणि कमी केल्याने वस्तूंच्या किंमतीत फरक पडला आहे. या निर्णयाचा फटका थेट मध्यम वर्गीय कुटुंबीयांना सहन करावा लागतो.

जीएसटी परिषदेत ऑनलाइन गेमिंग कंपनी, कॅसीनो, घोड्यांच्या शर्यतीवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Cinema Hall
Share Market Closing: शेअर बाजारवर पैशांचा पाऊस! गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात झाली 2 लाख कोटींची वाढ

अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, 'ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत गेमिंगच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर २८ टक्के जीएसटी कर लावण्यावर एकमताने निर्णय घेण्यात आला. तसेच मल्टी यूटिलिटी वाहनावर २२ टक्के जीएसटी कर लावण्यास मंजूरी दिली आहे.

Cinema Hall
Investment Scheme: 13 13 13 च्या या फॉर्म्युल्यासह करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळणार 53 लाख रुपये...

काय झालं स्वस्त?

कँन्सर आणि अन्य दुर्मिळ आजारांवरील औषध आणि विशेष मेडिकल खाद्य पदार्थांना जीएसटीतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.

खासगी कंपनीद्वारे देण्यात येणाऱ्या सॅटेलाइट लाँचच्या सेवेवर जीएसटीची सूट देण्यात आली आहे. फिश सॉल्यूबल पेस्ट आणि एलडी स्लॅगवर जीएसटी १८ टक्के कमी करून ५ टक्के केला आहे. सिनेमागृहामधील पॉपकॉर्न आणि अन्य पदार्थावरील जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com