Share Market Closing: शेअर बाजारवर पैशांचा पाऊस! गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात झाली 2 लाख कोटींची वाढ

Share Market Today: शेअर बाजारवर पैशांचा पाऊस! गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात झाली 2 लाख कोटींची वाढ
Share Market Closing
Share Market ClosingSaam Tv
Published On

Stock Market Closing On 11 July 2023: भारतीय शेअर बाजारसाठी मंगळवारचा दिवस आहे चांगला ठरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 273 अंकांनी उसळी घेऊन बंद झाला. तर निफ्टी 19,450 च्या जवळ पोहोचला. ब्रॉडर मार्केटमध्येही तेजीचा कल होता. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.97 टक्के आणि 0.80 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

मेटल आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज तेजी पाहायला मिळाली. यापैकी ऑटो, पॉवर, एफएमसीजी, कॅपिटल गुड्स आणि फार्मा शेअर्सच्या निर्देशांकात प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे दोन लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market Closing
Investment Scheme: 13 13 13 च्या या फॉर्म्युल्यासह करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळणार 53 लाख रुपये...

आज बाजार बंद होताना बीएसई मधील 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 273.67 अंकांनी वाढून 65,617.84 वर बंद झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 83.50 अंकांच्या वाढीसह 19,439.40 च्या पातळीवर बंद झाला.  (Latest Marathi News)

गुंतवणूकदारांनी 2 लाख कोटी रुपये कमावले

बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 10 जुलै रोजी 301.39 लाख कोटी झाले आहे. जे त्यांच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार 10 जुलै रोजी 299.41 लाख कोटी होते. अशा प्रकारे आवाज बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 1.98 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत बोलायचं म्हटलं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.98 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Share Market Closing
Share Market: एक लाखाची गुंतवणूक झाली 40 लाख, 8 रुपयांचा शेअरमध्ये जबरदस्त वाढ

या 5 शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण

दरम्यान, सेन्सेक्समध्ये आज 11 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामध्येही बजाज फायनान्सचे शेअर्स सर्वाधिक 2.94 टक्क्यांनी घसरले. या व्यतिरिक्त अॅक्सिस बँक (Axis Bank), एचसीएल टेक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एचडीएफसीचे (HDFC) चे शेअर्स देखील आज लाल चिन्हात बंद झाले आणि सुमारे 0.50 टक्के ते 0.94 टक्क्यांपर्यंत घसरले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com