CNG Price Hike Saam Tv
बिझनेस

CNG Price Hike : महागाईचा आणखी एक दणका; पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजी गॅसच्या दरात वाढ, किती रुपयांनी वाढले दर?

CNG Price Hike News : सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक दणका बसला आहे. पेट्रोल-डिझेलनंतर सीएनजी गॅसच्या दरात वाढ केली आहे.

Vishal Gangurde

नाशिक : सीएनजी वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. सीएनजी वाहनधारकांच्या खिशात्रा कात्री लागणार आहे. सीएनजी दरवाढीचा फटका सर्वसामान्यांनाच बसणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा दुहेरी दणका बसला आहे. नाशिकमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो ७५ पैशांनी वाढ झाली आहे.

सीएनजी गॅसच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार आहे. नाशिकमध्ये CNG च्या दरात प्रतिकिलो ७५ पैशांनी वाढ केली आहे. नवी दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून CNG चा दर प्रतिकिलो ९१.९० रुपयांवरून ९२.६५ रुपयांवर पोहोचला आहे.

इंद्रप्रस्था गॅस लिमिटेडने सीएनजीची किंमत वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे शेअर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. गॅस वितरण कंपनीने सीएनजी गॅसच्या किंमतीत १ ते ३ रुपये प्रति किलोग्रॅम वाढ करण्याची घोषणा केली आहे. राजधानी दिल्लीत १ रुपये प्रति किलोग्रॅमची वाढ केली आहे. तर इतर शहरात ३ रुपये प्रति किलोग्रॅम केली आहे.

जून २०२४ नंतर पहिल्यांदा सीएनजी दरात वाढ केली आहे. आयजीएलचा एकूण सीएनजी विक्रीत ७० टक्के भाग आहे. तर इतर कंपन्यांचा ३० टक्के भाग आहे. सीएनजी गॅसच्या दरात वाढ केल्याने दिल्लीत सीएनजीचा दर प्रति किलोग्रॅम ७६.०९ रुपयांवर पोहोचला आहे. तर नोव्हेंबर २०२४ मध्ये आईजीएलने दिल्ली व्यतिरिक्त इतर बाजाराच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT