CNG Price Hike Saam Tv
बिझनेस

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या

CNG Price Hike By 2 Rupees: सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीच्या किंमती वाढल्याने वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. महानगर गॅस लिमिटेडने राज्यातील सीएनजीच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. सीएनजीच्या किंमतींमध्ये २ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने केलेल्या घोषणेनुसार, राज्यात सीएनजीच्या किंमती २ रुपये किलोग्रॅमने वाढल्या आहेत. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणी या नवीन किंमती लागू करण्यात आल्या आहे. मुंबईत आधी सीएनजीची किंमत ७५ रुपये प्रति किलोग्रॅम होती. त्यानंतर आता यात २ रुपयांनी वाढ झाली असून आता सीएनजी ७७ रुपये प्रति किलोग्रॅमवर विकले जाणार आहे.

सीएनजीच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. सीएनजीच्या किंमती वाढल्याने टॅक्सी, ऑटो रिक्षा चालकांवर चांगलाच परिणाम होणार आहे. टॅक्सी, ऑटो रिक्षा या सीएनजी गॅसवर चालतात. तसेच देशात डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांनाही फटका बसू शकतो.

सीएनजीच्या किंमती

दिल्लीत सीएनजीची किंमत ७५.०९ रुपये प्रति किलो आहे.

चेन्नईमध्ये सीएनजीची किंमत ९०.५० रुपये प्रति किलो आहे.

बंगळुरुमध्ये सीएनजीची किंमत ८४.८५ रुपये प्रति किलो आहे.

चंदीगडमध्ये सीएनजीची किंमत ९०.५० रुपये आहे.

हैदराबादमध्ये सीएनजीची किंमत ९२.०० रुपये आहे.

हैदराबादमध्ये सीएनजीची किंमत ९१.४१ रुपये आहे.

पाटण्यात सीएनजीची किंमत ८४.५४ रुपये प्रति किलो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT