CNG Price Hike Saam Tv
बिझनेस

CNG Price Hike: सर्वसामान्यांना मोठा झटका; सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

CNG Price Hike Today: सर्वसामान्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीच्या किंमती जवळपास १ रुपयांनी वाढले आहेत.

Siddhi Hande

सर्वसामान्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी

सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ

दिल्लीत सीएनजीचे दर १ रुपयांनी वाढले

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पेट्रोल डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. सीएनजीचे दर जवळपास १ रुपयांनी वाढले आहे. दिल्लीत पुन्हा एकदा सीएनजीचे दर वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी सीएनजीचे दर २ रुपयांनी वाढले होते. त्यानंतर आता १ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

सीएनजीचे दर वाढले (CNG Price Hike in Delhi)

दिल्लीत आज पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात १ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत १ किलो सीएनजीचे दर ८०.०९ रुपये आहेत. तर मुंबईत सीएनजीचे दर ८१ रुपये आहेत. दोन दिवसांपूर्वीच सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे हा सर्वसामान्यांसाठी मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे.

दरम्यान, सीएनजीचे दर वाढले असले तरीही पीएनजीच्या किंवा घरगुती गॅसच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. पीएनजी आणि घरगुती गॅसच्या किंमती स्थिर आहेत.

महाराष्ट्रातील सीएनजीचे दर (CNG Rates in Maharashtra)

पुण्यात सीएनजीचे दर ९१.५० रुपये प्रति किलो

नाशिकमध्ये सीएनजी ९३.६५ रुपये प्रति किलो

साताऱ्यात सीएनजीचे दर ९५.५० रुपये प्रति किलो

सोलापूरमध्ये सीएनजीचे दर ९३ रुपये प्रति किलो

ठाण्यात सीएनजीचे दर ८१ रुपये प्रति किलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT