CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Shreya Maskar

CNG

आजकाल सीएनजी भरण्याची संख्या पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे, कारण पेट्रोल आणि डिझेलपेक्षा ते स्वस्त आणि पर्यावरणासाठी चांगले मानले जाते. आज आपण सीएनजी भरण्याची एक योग्य वेळ आणि योग्य पद्धत जाणून घेऊयात.

CNG | pinterest

CNG भरण्याची योग्य वेळ

सकाळी लवकर साधारण ५ ते ८ च्या दरम्यान किंवा रात्री उशिरा सीएनजी भरणे उत्तम असते. कारण, यावेळी तापमान कमी असते आणि थंड वायू अधिक घन असतो. वायू अधिक घन असल्यामुळे, तो सिलेंडरमध्ये जास्त प्रमाणात भरतो. त्यामुळे या वेळी तुम्हाला जास्त सीएनजी मिळतो आणि तुमचे वाहन अधिक चांगल्या प्रकारे चालते.

The Right Time to Refill CNG | pinterest

दुपारची वेळ टाळा

दुपारच्या वेळी सीएनजी भरणे फायदेशीर नसते. दिवसाच्या उच्च तापमानामुळे वायू प्रसरण पावतो. यामुळे टाकी लवकर भरलेली दिसते, परंतु प्रत्यक्षात त्यात कमी गॅस असतो. याचा अर्थ तुम्ही पूर्ण रक्कम भरत आहात, पण तुम्हाला कमी गॅस मिळत आहे. त्यामुळे, ऐन उन्हाळ्यात सीएनजी भरणे टाळा.

Avoid Afternoon Hours | pinterest

CNG पंपची निवडा

CNG भरताना योग्य सीएनजी पंप निवडणे देखील गरजेचे असते. कारण सर्व सीएनजी स्टेशनवरील दाब सारखा नसतो. जे पंप थेट पाईपलाईनला जोडलेले असतात, तिथे गॅसचा दाब जास्त आणि अधिक स्थिर असतो. याउलट, लहान पंपांवर जिथे ट्रकद्वारे गॅस येतो, तिथे दाब किंचित कमी असू शकतो.

Choosing the Right CNG Pump | pinterest

गर्दीचे ठिकाण टाळा

जर पंपावर खूप गर्दी असेल, तर वाहनांमध्ये सतत गॅस भरल्यामुळे दाब कमी होऊ शकतो. त्यामुळे, कमी गर्दीच्या पंपावर जाणे अधिक फायदेशीर ठरते.

Avoid Crowded Locations | pinterest

मशीन

सीएनजी भरताना मशीनवर दिसणारा प्रेशर गेज तपासणे ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. साधारणपणे, २००-२२० बारच्या आसपासचा दाब चांगला मानला जातो. जर दाब यापेक्षा कमी असेल, तर तुमच्या गाडीत गॅस भरता येणार नाही.

Machine | pinterest

गाडीचे इंजिन

CNG भरताना गाडीचे इंजिन नेहमी बंद ठेवा आणि मोबाईल फोनचा वापर करणे टाळा. CNG टाकी कधीही क्षमतेपेक्षा जास्त भरू नका.

The Vehicle Engine | pinterest

इंधन टाकी

इंधन भरून झाल्यानंतर इंधन टाकीचे झाकण (Lid) व्यवस्थित बंद झाले आहे ना, याची खात्री करा. CNG सिलिंडरमध्ये काही बिघाड किंवा गळती आहे का, याची नियमित तपासणी करून तुमची CNG गाडी नेहमी सुस्थितीत ठेवा.

car | yandex

NEXT : पॅनिक अटॅक आल्यावर घाबरू नका, पटकन करा 'हा' उपाय

Panic Attack Remedies | saam tv
येथे क्लिक करा...