Shreya Maskar
तुम्हाला अस्वस्थ किंवा चक्कर आल्यासारखे वाटताच, दीर्घ श्वास घ्या. यामुळे तुमचे हृदय शांत होईल आणि तुम्हाला अधिक आराम वाटेल. तुमचे डोके डावी-उजवीकडे हलवा. थंड पाणी प्या.
पॅनिक अटॅकच्या वेळी घाईघाईत हालचाल करू नका, जिथे आहात तिथेच थांबा आणि शांत व्हा. हालचालीमुळे चक्कर येऊन तुम्ही पडू शकता, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडते.
पॅनिक अटॅकच्या वेळी मनात नकारात्मक विचार येतात. त्यामुळे आपल्या मनावर नियंत्रण राहत नाही. अशा विचारांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचार करा. देवाचे ध्यान करा.
ग्रीन टीमध्ये एल-थिएनाइन नावाचे अमिनो ॲसिड असते, जे मेंदूला शांत करते आणि तणाव कमी करण्यास मदत करते. हे मेंदूतील अल्फा लहरींना सक्रिय करते, ज्यामुळे चिंता कमी होऊन आराम मिळतो.
बदाम मॅग्नेशियमने समृद्ध असतात. मॅग्नेशियम शरीरातील तणाव संप्रेरक कमी करण्यास आणि मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करते. बदामातील घटक रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि शांतता वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे पॅनिक अटॅकच्या वेळी होणारी अस्वस्थता कमी होऊ शकते.
लोक अनेकदा पॅनिक अटॅकला हार्ट अटॅक समजतात, त्यामुळे जर तुम्हाला अचानक पॅनिक अटॅक आला तर घाबरू नका. ताबडतोब मित्र किंवा जवळच्या व्यक्तीला कळवा आणि त्यांची मदत घ्या. जास्तच वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पॅनिक अटॅकच्या वेळी हृदयाचे ठोके वेगाने वाढतात, श्वास घेण्यास त्रास होतो, घाम येतो आणि चक्कर येते अशी शारीरिक लक्षणे ५ ते २० मिनिटांपर्यंत राहतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.