Car Under 10 Lakh:
हॅचबॅक असो की सेडान, लोक सीएनजी इंजिनला अधिक पसंती देत आहेत. Hyundai च्या या सेगमेंटमध्ये Grand i10 Nios आणि Aura या दोन कार्स येतात. दोन्ही नवीन जनरेशन कार आहेत. ज्यात नवीन फीचर्स आणि पॉवरफुल इंजिन दिले आहे. यातच आपण या दोन्ही कार्सच्या फीचर्स आणी किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ....
या कारची एक्स-शोरूम किंमत 7.27 लाख रुपये आहे. यामध्ये CNG इंजिनचा पर्याय देखील उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार CNG वर 27 km/kg पर्यंत मायलेज देते. कारच्या मागील बंपरवर Y आकाराचे LED DRL देण्यात आले आहेत. या क्युटर कारमध्ये सहा मोनोटोन आणि दोन ड्युअल टोन कलर देण्यात आले आहेत. ह्युंदाईच्या या कारला एलईडी टेल लॅम्पसह प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत.
Hyundai Grand i10 Nios मध्ये 15 इंची अलॉय व्हील्स आहेत. या फॅमिली कारमध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज आणि ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम यासारखे फीचर्स आहेत. कारमध्ये 8 इंची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. ही फाय सीटर हॅचबॅक सेगमेंटची कार आहे. एरा, मॅग्ना, स्पोर्ट्झ आणि अस्टा या चार प्रकारांमध्ये ही कार उपलब्ध आहे. कारमध्ये शार्क फिन अँटेना देण्यात आला आहे.
या मोठ्या आकाराच्या कारची एक्स-शोरूम किंमत 7.94 लाख रुपये आहे. Hyundai ची ही फाय सीटर कार चार ट्रिम E, S, SX आणि SX(O) मध्ये उपलब्ध आहे. याचे सीएनजी इंजिन 10.13 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार CNG वर 22 km/kg पर्यंत मायलेज देते.
ऑरा सहा रंगांच्या पर्यायांमध्ये येते. कारमध्ये 8 इंची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 83 पीएस पॉवर आणि 114 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि सीट ॲडजस्टचा पर्याय आहे. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.