Rule Change From 1st August SAAM TV
बिझनेस

Rule Change From 1st August : आजपासून देशात कोणते बदल होणार? जाणून घ्या एका क्लिकवर, ५ मोठे निर्णय

Rule Change : १ ऑगस्टपासून देशभरात काही बदल करण्यात आले आहे. यात एलपीजी सिलेंडर, गुगल मॅप, आयटीआर आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड यांचा समावेश आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.

Shreya Maskar

आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून देशभरात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी नियमांमध्ये अनेक बदल होतात. या महिन्यात झालेले बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या ५ मोठ्या बदलांबद्दल जाणून घेऊयात.

एलपीजी सिलेंडरच्या दरात घट होण्याची शक्यता

एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदली जाते. गेल्या महिन्यात सरकारने १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात केली होती. अशा स्थितीत ऑगस्ट महिन्यातही सरकार सिलेंडरच्या किंमती कमी करू शकतात अशी शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये १३ दिवस बँकांना सुट्ट्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. बँकांना १३ दिवस सुट्टी राहणार असून कामकाज बंद राहील. अशा परिस्थितीत जर तुमचे बँकिंग संबंधित काम अडकले असेल तर बँकेत जाण्यापूर्वी ऑगस्ट बँक हॉलिडे

आयटीआर भरल्यास दंड आकारला जाईल

३१ जुलै ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख होती. या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत सात कोटींहून अधिक आयटीआर भरले गेले. तुम्ही जर ३१ जुलै २०२४ पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. यावेळी आयटीआर भरण्यास तुम्ही चुकला असाल तर वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भरू शकता. विलंबित आयटीआर फाइल करू शकता. तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर दंड १००० रुपयांपर्यंत असू शकतो.

गुगल मॅपमध्ये मोठा बदल

गुगल मॅप भारतात मोठा बदल घडवत आहे. १ ऑगस्टपासून, गुगल मॅपची कंपनी ७०% कमी सेवा शुल्क आकारणार आहे. जेणेकरून जास्त ग्राहक जोडले जातील. त्याच बरोबर बिलिंग डॉलर रुपयात बदले जातील. यामुळे सर्वसामान्यांच्या गुगल मॅपच्या दैनंदिन वापरावर कोणताही परिणाम होणार नाही.

एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर अतिरिक्त शुल्क आकारणार

एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्डचे नियम आजपासून म्हणजे १ ऑगस्टपासून बदलत आहेत. क्रेडिट,मोबिक्विक ,फ्री रिचार्ज ने ट्रांजेक्शन केल्यास १% व्यवहार शुल्क आकारले जाईल. याशिवाय ५००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पेट्रोल आणि डिझेल एकाच वेळी भरल्यास आणि ५०,००० रुपयांपेक्षा जास्त वीज आणि पाणी बिल भरल्यास १% शुल्क आकारले जाईल. बँकेने उशीरा पेमेंट आणि सुलभ ईएमआयसाठी शुल्क देखील वाढवले ​​आहे. प्रत्येक वेळी अतिरिक्त शुल्क ३००० रुपयांपेक्षा जास्त असणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांना त्या दिवशी फोन का केला होता? प्रफुल्ल पटेलांनी दिलं उत्तर

Viral Video: 31 व्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर भलंमोठं मधमाश्यांचं पोळं; रहिवाश्यांनी केला व्हिडीओ शेअर

मनसे प्रमुख राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या घरी; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Revati Lele Wedding: प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात; पुण्यातील राहत्या घरी झाला ग्रहमख विधी; PHOTO पाहा

Amol Kolhe: विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते, रोहित पवारांचा दावा कितपत खरा?, कोल्हे म्हणाले...

SCROLL FOR NEXT