Central Government increases DA to 58% – Employees and Pensioners to get higher salary and arrears from July 2025. saam tv
बिझनेस

DA Hike: महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढेल? असं असेल कॅल्क्युलेशन

Central Govt Dearness Allowance Increases : केंद्र सरकारने महागाई भत्ता ३% ने वाढवलाय. या वाढीनुसार आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५८% पर्यंत वाढ झालीय. या वाढीचा फायदा ४९.१९ लाख कर्मचाऱ्यांना आणि ६८.७२ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

Bharat Jadhav

  • केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ केली.

  • कर्मचारी व पेन्शनधारकांना आता ५८% महागाई भत्ता मिळणार.

  • ४९.१९ लाख कर्मचारी आणि ६८.७२ लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं ४९.१९ लाख कर्मचारी आणि ६८.७२ लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी दिली. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केलीय.सरकारनं महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ केली आहे. या महागाई भत्त्यानुसार कर्मचाऱ्यांना ५८ टक्के महागाई भत्ता मिळेल. डीए आणि डीआरमधील ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे. याचा अर्थ सप्टेंबरच्या पगारासोबतच कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जुलै ते सप्टेंबरपर्यंतची थकबाकीही मिळणार आहे.

बेसिक सॅलरीवरून मिळतो डीए

कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता आणि डीआर हा कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीवरून दिला जातो. समजा, कोणत्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ६०,००० रुपये असेल तर त्याला ५८ टक्के प्रमाणे महागाई भत्ता हा ३४८०० रुपये मिळेल. म्हणजेच कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या सॅलरीमध्ये १८ रुपये वाढून येईल. यासह कर्मचाऱ्यांना त्यांच्या सॅलरीसह जुलै ते सप्टेंबरपर्यंत एरिअरच्या रुपात ५४०० रुपये मिळतील.

केंद्र सरकारने यावर्षी जानेवारीमध्येही महागाई भत्ता वाढवला होता. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, महागाई भत्ता आणि महागाई भत्ता वाढल्याने सरकारी तिजोरीवर वर्षाला एकूण १०,०८३.९६ कोटी रुपयांचा प्रभाव पडणार आहे. ही वाढ ७ वे वेतन केंद्रीय आयोगानुसार करण्यात आलीय. याआधी केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि डीआरमध्ये २-२ टक्के वाढ केली होती. जी १ जानेवारी २०२५ पासून लागून करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट; वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर दाखल

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

Thursday Horoscope: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ४ राशींचे नशीब बदलणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Mahanagarpalika Election: मुंबईत फक्त महायुती, इतर ठिकाणी स्वतंत्र; स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा असा प्लॅन का? काय आहे रणनीती?

SCROLL FOR NEXT