Budget 2024 Saam Tv
बिझनेस

Central Government Schemes: झोपडपट्ट्या आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्यांना मिळणार स्वतःचं घर, सरकार आणणार योजना; अर्थमंत्र्यांनी केली घोषणा

Budget 2024 : भाड्याची घरे, झोपडपट्ट्या, आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गातील पात्र लोकांना स्वतःचे घर विकत घेण्यासाठी सरकार एक योजना सुरू करेल'', असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

साम टिव्ही ब्युरो

Central Government Schemes:

"भाड्याची घरे, झोपडपट्ट्या, किंवा चाळी आणि अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गातील पात्र लोकांना स्वतःचे घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मदत करण्यासाठी सरकार एक योजना सुरू करेल'', अशी घोषणा आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेच्या (ग्रामीण) यशाचा उल्लेख करत केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या की, कोविड काळात आव्हाने असतानाही, योजनेची अंमलबजावणी सुरूच राहिली आणि आता सरकार तीन कोटी घरांचे उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहे. त्या म्हणाल्या की कुटुंबांची संख्या वाढल्यामुळे उद्भवणारी गरज पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्षांत आणखी दोन कोटी घरे बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र सरकार 2047 पर्यंत भारताला 'विकसित भारत' बनवण्यासाठी सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत आहे, यावर निर्मला सीतारामन यांनी भर दिला. (Latest Marathi News)

‘गरीब, महिला, तरुण, शेतकरी या सरकारसाठी लक्ष केंद्रित करण्याजोग्या चार प्रमुख जाती: केंद्रीय अर्थमंत्री

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘गरीब, महिला, तरुण, शेतकरी या चार प्रमुख जातींवर लक्ष केंद्रित करण्यावर ठाम विश्वास ठेवते, असे निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत. “त्यांच्या गरजा, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांच्या प्रगतीवरच देशाची प्रगती अवलंबून आहे. या चारही वर्गांना त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता असते आणि ती त्यांना पुरवण्यात येते. त्यांचे सक्षमीकरण आणि कल्याण देशाला प्रगतीपथावर नेईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारचे लक्ष फलनिष्पत्तीवर आहे, खर्चावर नाही: अर्थमंत्री

सामाजिक न्याय हा एक प्रभावी आणि आवश्यक प्रशासन आदर्श प्रारूप आहे, असे मत निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचार कमी करण्यावर भर दिल्याने पारदर्शकता आली असून सर्व पात्र लोकांना त्याचा लाभ प्राप्त झाला आहे आणि 'थेट लाभ हस्तांतरण' प्रणालीद्वारे हे साध्य झाले आहे, यावर त्यांनी जोर दिला. सरकारचे लक्ष फलनिष्पत्तीवर आहे, खर्चावर नाही, असेही त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT