Under the Pradhan Mantri Awas Yojana, the benefit of housing is provided to citizens of urban and rural areas. saam tv
बिझनेस

PM Awas Yojana: पीएम आवास योजनेच्या नियमात मोठे बदल; कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

PM Awas Yojana Big Update: केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. PM Awas Yojana-चा लाभ कोणाला मिळू शकतो. या योजनेत अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • केंद्र सरकारने पीएम आवास योजनेच्या नियमात मोठे बदल केले

  • PMAY-U 2.0 टप्पा 1 सप्टेंबर 2024 पासून लागू

  • शहरी भागातील EWS, LIG आणि MIG कुटुंबांना लाभ

आपल्या हक्काचं घर व्हावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. परंतु वाढत्या महागाईमुळे अनेकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. सामन्या कुटुंबातील लोकांसाठी तर घर बांधणं किंवा घेणं मोठं स्वप्न असतं. घरासाठी ते आयुष्यभराची कमाई खर्च करत असतात. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारनं पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेतून शहरातील आणि ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक मदत केली जाते. दरम्यान आता या पंतप्रधान आवास योजनेच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेत.

केंद्र सरकारने देशातील शहरांमधील नागरिकांसाठी १ एप्रिल २०१६ रोजी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. त्यानंतर, त्याचा दुसरा टप्पा, PMAY-U 2.0 १ सप्टेंबर २०२४ पासून लागू केला होता. या टप्प्याचे उद्दिष्ट पुढील ५ वर्षांत शहरी भागात राहणाऱ्या EWS, LIG ​​आणि MIG श्रेणीतील कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे हा होता.

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

पंतप्रधान आवास योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटांना समाविष्ट केले जाते. यात EWS श्रेणीतील लोकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत, मध्य उच्च उत्पन्न गटातील लोकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत आणि मध्यमवर्गीय श्रेणीतील लोकांचे उत्पन्न ९ लाख रुपयांपर्यंत असले पाहिजे.

या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी २.५ लाखांपर्यंतची मदत दिली जाते. यापैकी १.५ लाख केंद्र सरकार आणि १ लाख रुपये राज्य सरकारकडून निधी दिला जातो. याव्यतिरिक्त १.८ लाखांपर्यंतच्या व्याज अनुदानाची तरतूददेखील आहे. या योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासीय, रस्त्यावरील विक्रेते आणि काम करणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाते.

नियमांमध्ये कोणता मोठा बदल झाला आहे?

पंतप्रधान आवास योजनेबाबत सरकारने आता स्पष्ट केले आहे की, ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी ज्यांच्याकडे जमीन होती तेच या योजनेसाठी पात्र असतील. म्हणजेच जर तुम्ही घर बांधण्यासाठी प्लॉट घेतला असेल पण त्याची खरेदी ३१ ऑगस्ट २०२४ नंतरची असेल तर त्यांना सरकारकडून मदत मिळणार नाही. तसेच प्लॉट निवासी क्षेत्रात असणे आवश्यक आहे. निवासी क्षेत्राबाहेरील जमीन पंतप्रधान आवास योजनेच्या लाभांसाठी पात्र राहणार नाहीत.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निधी मिळविण्यासाठी पात्रता लाभार्थी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय. अर्जदारांनी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आता आवश्यक असेल. नोंदणीनंतर, महानगरपालिका किंवा स्थानिक संस्थेची एक टीम प्रत्यक्ष पडताळणी करेल. पडताळणी योग्य असल्याचे आढळल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल आणि त्यावर आधारित रक्कम चार हप्त्यांमध्ये वितरित केली जाईल.

कोणते कागदपत्रे लागतील?

पात्रता सिद्ध करण्यासाठी, अर्जदाराला तो देय तारखेपूर्वी तेथे राहत होता याचा पुरावा द्यावा लागेल. यासाठी वीज किंवा पाण्याचे बिल, महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या पावत्या किंवा जुन्या मतदार यादीतील नावे दर्शविणारी कागदपत्रे ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वीच्या हव्या. सरकार जिओ-टॅगिंग आणि सॅटेलाइट इमेजिंगद्वारे देखील तपास करत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळीध्ये चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू; उपचार नाकारल्याचा आरोप करत हॉस्पिटलला घेराव

गायिका अंजली भारतीला दणका; अमृता फडणवीसांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार, राज्य महिला आयोगाकडून कारवाईसाठी पहिलं पाऊल

Anjali Bharati: अमृता फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अंजली भारती कोण आहे?

Dry Fruit Laddu Recipe: संध्याकाळी काम करताना लागलेल्या भूकेसाठी बनवा साखरे नसलेला टेस्टी आणि हेल्दी ड्राय फ्रूट लाडू

Indian Railways:रेल्वेत दारू नेता येते का? जर दारूची बाटली सापडली तर काय होते शिक्षा, काय आहेत नियम?

SCROLL FOR NEXT