मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो; ३५ KM अंतर २०स्टेशन,६ भूमिगत स्थानके; मुख्यमंत्र्यांनी सांगितला मेट्रोलाइन ८चा आराखडा

Mumbai–Navi Mumbai Airport Metro Project: मंत्रिमंडळाने मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाला मंजुरी दिली आहे. ३५ किमी लांबीच्या या प्रकल्पात २० स्थानके असतील ज्यात ६ भूमिगत थांबे असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली.
Mumbai–Navi Mumbai Airport Metro Project:
Chief Minister Devendra Fadnavis presented the route plan of the Mumbai to Navi Mumbai Airport Metro project.
Published On
Summary
  • मुंबई ते नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो लाईनला मंत्रिमंडळाची मंजुरी

  • 35 किमी अंतरात एकूण 20 मेट्रो स्थानकांचा समावेश

  • 6 स्थानके भूमिगत असणार, प्रवास अधिक वेगवान होणार

मुंबई ते नवी मुंबई विमानतळदरम्यान मेट्रो ट्रेन धावणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या २४ किलोमीटर अंतराच्या मेट्रोलाइन मान्यता देण्यात आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नव्या मेट्रोलाइनच्या मंजुरीची माहिती दिली. यासह त्यांनी मार्गाचा आराखडा देखील सांगितला.

Mumbai–Navi Mumbai Airport Metro Project:
Amrit Bharat Express: उत्तर महाराष्ट्र थेट जोडणार पूर्व भारताशी; आता नाशिक, जळगावहून थेट दार्जिलिंग गाठा, जाणून घ्या ट्रेनचं वेळापत्रक

मुंबईतील नव्या मेट्रोसह समृद्धी महामार्गाच्या विस्तार, नाशिक शहर परिक्रमा मार्ग, सुरजागड महामार्गाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबईतील मेट्रो लाईन ८ च्या काम लवकरच सुरू करण्यात येणार असून सरकार लवकरात लवकर या मेट्रोलाइनचे लोकार्पण करण्याच्या बेतात आहे. त्याचमुळे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांनी जमिनी अधिग्रहण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिलेत.पुढील सहा महिन्यात या मेट्रोलाइनसाठी लागणाऱ्या जमिनीचं अधिग्रहण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.

Mumbai–Navi Mumbai Airport Metro Project:
वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो लाईन ८चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. त्यानंतर प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्यात यावा. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व परवानगी प्राप्त करून घ्याव्यात, असे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या मेट्रो मार्गाची लांबी ३५ किलोमीटर आहे. या मार्गावर ९.२५ किलोमीटर भूमिगत आणि २४ किमीपर्यंत उन्नत मार्ग असेल. या मार्गावर एकूण २० स्टेशन असतील, यातील ६ स्थानके भूमिगत आणि १४ स्थानके उन्नत असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com