प्रमोद जगताप, नवी दिल्ली
नवी दिल्ली: कांद्यावरील निर्यात बंदी असल्याने शेतकरी वर्गात केंद्र सरकारविरुद्धात नाराजी आहे. त्यात वाणिज्य मंत्रालयाने गुजरातमधील २ हजार पांढरा कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलीय. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
मात्र त्याला अद्याप परवानगी न देता सरकारने फक्त गुजरातच्या पांढऱ्या कांद्या बाबत निर्णय घेतला. वाणिज्य मंत्रालयने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिलीय. दरम्यान केंद्र सरकारने ८ डिसेंबरपासून निर्यात बंदी लागू केलीय. ही निर्यात बंदी हटवण्यात यावी अशी मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र त्याला अद्याप परवानगी न देता सरकारने फक्त गुजरातच्या पांढऱ्या कांद्याबाबत निर्णय घेतलाय. या कांद्याची निर्यात मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि नाव्हाशेव्हा म्हणजे जेएनपीटी पोर्टवरून केली जाणार असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने परिपत्रकातून दिलीय.
राज्यातील कांद्याचा प्रश्न बिकट होत असताना शेतकरी सातत्याने निर्यात खुली करण्याची मागणी केली जातेय. पण त्यावर सरकारने अद्याप कोणताच निर्णय घेतला नाहीये. त्यादरम्यान गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची २००० मेट्रिक टन निर्यातीसाठी परवानगी देण्यात आलीय. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता.
केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी लागू केल्याने राज्यात कांद्याचे दर घसरलेत. कांद्याचे दर घसरल्याने बळीराजाला कमी दरात कांद्याची विक्री करावी लागतेय. शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकरी, शेतकरी संघटना आदींच्या माध्यमातून कांदा निर्यात खुली करण्यासाठी आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र अद्यापही यावर तोडगा निघू शकलेला नाहिये. त्याच दरम्यान केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी परवानगी दिल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी नाराजी झालेत.
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने याबाबतचे परिपत्रक काढले असून यानुसार २ हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात केला जाणार आहे. गुजरात राज्यातील मुंद्रा पोर्ट, पिपापाव पोर्ट आणि नाव्हाशेव्हा/ जेएनपीटी पोर्टवरून निर्यात केली जाणार आहे. विशेष म्हणजे एनसीएल च्या माध्यमातून निर्यात न करता थेट निर्यातदारांच्या माध्यमातून हि निर्यात केली जाणार आहे.
यावर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीय. एकीकडे लाल आणि उन्हाळ कांदा कवडीमोल भावात विकला जात आहे, गेल्या अनेक दिवसांपासूनची असलेली निर्यात खुली करण्याच्या मागणीवर शासन अद्यापही उदासीन आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.