Government New Rule Saam Tv
बिझनेस

Government New Rule: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम करा अन्यथा...; नवीन नियम जारी

New Rule For Government Employees: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वतः ची पडताळणी करायची आहे.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनच्या नियमांमध्ये पुन्हा बदल करण्यात आले आहे. आता कर्मचाऱ्यांना १८ वर्षांची सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर काही गोष्टी करणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते.

कार्मिक मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि वेतनधारक कल्याण विभागाने जारी केलेल्या गाइडलाइननुसार, १८ वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना स्वतः ची पडताळणी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करणे खूप आवश्यक असलेल्याचे सांगण्यात आले आहे.

DoPPW ने दिलेल्या गाइडलाइन्सनुसार, १८ वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्तीसाठी पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना नियतकालिक पडताळणी करणे गरजेचे आहे. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची पात्रता निश्चित करण्यास मदत होईल. तसेच कर्मचाऱ्याबद्दल सर्व माहिती मिळवण्यासाठी मदत होईल.

सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, विभाग प्रमुख आणि लेखा कार्यालय हे संयुक्तपणे कर्मचाऱ्यांची पडताळणी करतील. यानंतर कर्मचाऱ्याला पडताळणी प्रमाणपत्र दिले जाईल. केंद्रिय नागरी सेवा नियम २०२१ अंतर्गत सत्यापन सर्व कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. सेवानिवृ्त्तीच्या आधी पाच वर्षे तरी ही पडताळणी पूर्ण झालेली असावी.अन्यथा तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

ही सर्व प्रक्रिया निवृत्तीपूर्वी करायची आहे. याबाबत सूचना जाहीर करण्यात आल्या आहे. हे प्रमाणपत्र वेळेवर सादर करायचे आहे. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार; PM मोदींचा गंभीर आरोप

Ekta kapoor : घाबरून कधीच काम केलं नाही, मी हिंदू; एकता कपूर काय म्हणाली ?

कोणत्या देशात सर्वात जास्त भात खाल्ला जातो?

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात

Alzarri Joseph: मैदानावर केलेली चूक नडली! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT