भारताच्या जनगणनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुढे ढकलण्यात आलेली भारतीची जनगणना आता पुन्हा सुरू होणार आहे. २०२५ मध्ये जनगणना सुरू होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत काहीच सांगण्यात आलेले नाही. यापूर्वी २०११ मध्ये जनगणना झाली होती. ताजी जनगणनेच्या आकडेवारीवरून लोकसभेच्या जागांचे सीमांकन होऊ शकते असे सांगितले जात आहे.
इंडिया टुडेच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, देशाच्या लोकसंख्येचे अधिकृत सर्वेक्षण २०२५ मध्ये सुरू होऊ शकते. हे सर्वेक्षण २०२६ पर्यंत सुरू राहील. जनगणनेनंतर लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होईल. ही प्रक्रिया २०२८ पर्यंत सुरू राहू शकते. काही काळापूर्वी जनगणनेबाबत सरकारकडून तयारी सुरू असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. पण अद्याप याबाबत अधिकृत काहीच सांगण्यात आले नाही.
२०२६ मध्ये जनगणनेचा अहवाल उपलब्ध होईल, असे सूत्रांच्या हवाल्याने न्यूज18ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. जनगणनेचे चक्र २०२५ ते २०२५ आणि २०२५ ते २०२४ पर्यंत असेल. विशेष म्हणजे देशातील विरोधी पक्ष सातत्याने जात जनगणनेची मागणी करत आहेत. पण मोदी सरकारने अद्याप जनगणनेबाबत काहीच निर्णय जाहीर केला नाही.
भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मृत्युंजय कुमार नारायण यांची केंद्रीय प्रतिनियुक्ती ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रदीर्घ प्रलंबित दशवार्षिक जनगणनेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी टीमचे नेतृत्व करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नारायण हे १९९५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. ते २०२० पासून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
अधिकृत अधिसूचनेनुसार, 'राष्ट्रपतींनी आयएएस अधिकारी मृत्युंजय कुमार नारायण, रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त, गृह मंत्रालयाच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीचा कालावधी ६ डिसेंबर २०२४ ते ४ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवला आहे. मृत्युंजय कुमार नारायण यांचे मुख्यालय नवी दिल्लीत असेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑगस्टमध्ये सांगितले होते की, 'हा अभ्यास योग्य वेळी केला जाईल आणि एकदा निर्णय झाला की मी स्वतः ते कसे केले जाईल ते जाहीर करेन.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.