PM Modi - Rishi Sunak Meet in G 20 Summit : इंडोनेशियाच्या बालीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी २० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर ब्रिटनच्या सरकारनं मोठा निर्णय घेतला. भारतीयांसाठी प्रत्येक वर्षी तीन हजार व्हिसा जारी करण्याची घोषणा केली. ब्रिटनमध्ये जाऊन करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हे व्हिसा देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.
ब्रिटन सरकारनं या निर्णयासंदर्भात अधिक माहिती दिली. भारत हा असा पहिला देश आहे, ज्या देशाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यूके आणि भारत (India) यंग प्रोफेशनल योजनेवर शिक्कामोर्तब झालं आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी १८ ते ३० वर्षे वयोगटातील तीन हजार प्रशिक्षित भारतीय तरुणांना दोन वर्षे ब्रिटनमध्ये राहता येऊ शकेल. त्यांना ब्रिटनमध्ये येऊन काम करता येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. (PM Narendra Modi)
ब्रिटन सरकारच्या म्हणण्यानुसार, ही योजना सुरू करणे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांसाठी महत्वाचा क्षण आहे. त्याचबरोबर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी ब्रिटन कटिबद्ध असल्याचेही यातून दिसून येते. (Tajya Batmya)
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सर्व देशांपेक्षा भारताचे ब्रिटनशी संबंध अधिक दृढ आहेत. ब्रिटनमध्ये जितके विद्यार्थी विदेशातून शिक्षणासाठी येतात, त्यात एक चतुर्थांश केवळ भारतातील असतात. भारतीय गुंतवणुकीमुळं संपूर्ण ब्रिटनमध्ये जवळपास ९५ हजार लोकांना रोजगार मिळतो, असं ब्रिटनच्या सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
जी २० परिषदेत मोदी-सुनक यांची पहिली भेट
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद भारतामध्ये व्यक्त करण्यात आला होता. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे सुनक हे मूळचे भारतीय वंशाचे आहेत. जी २० परिषदेत मोदी आणि सुनक यांची भेट झाल्यानंतर अवघ्या जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं होतं. सुनक यांची पंतप्रधान मोदींसोबतची पहिली भेट होती. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मोदींनी त्यांना थेट फोन करून भारतीयांकडून त्यांचे अभिनंदन केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.