8th Pay Commission google
बिझनेस

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आलीये. फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची मागणी, बेसिक पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होऊ शकते, पगाराचा फॉर्म्युला काय आहे आणि सरकारसमोर कोणते पर्याय आहेत, याची सविस्तर माहिती वाचा.

Surabhi Jayashree Jagdish

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. 8व्या वेतन आयोगाकडे कर्मचारी संघटना आणि इतर संबंधितांकडून सूचना व मागण्या पाठवण्याची अंतिम तारीख 15 जून होती. ही मुदत आता संपली असून यानंतर कोणत्याही नव्या सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे आयोगाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता आयोग कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्यांचा अभ्यास करून सरकारला कोणत्या शिफारसी करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

कर्मचारी संघटनांनी आयोगाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्यात. त्यामध्ये मिनिमम बेसिक पे वाढवणं, महागाई भत्ता (DA) बेसिक पेमध्ये विलीन करणं आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करणं या प्रमुख मागण्या आहेत. यापैकी Fitment Factor हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जातोय. कारण त्यात अगदी थोडाही बदल झाला तरी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

सध्या 7व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. कर्मचारी संघटनांची मागणी तो 3.83 करण्याची आहे. सरकारने ही मागणी मान्य केली तर देशातील सुमारे 55 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय?

फिटमेंट फॅक्टर हा असा आकडा आहे ज्याच्या आधारे जुन्या मूळ वेतनाचं नवीन मूळ वेतनात रूपांतर केलं जातं. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याचा नवीन बेसिक पगार किती असेल हे ठरवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल झाला की त्याचा थेट परिणाम पगार, पेन्शन आणि Arrears वर होतो.

कसा आहे याचा फॉर्म्युला?

'New Basic Pay: Current Basic Pay x FF

सध्या हा फॅक्टर 2.57 आहे. मात्र कर्मचारी संघटनांनी तो 3.83 करण्याची मागणी केली आहे.

आतापर्यंत फिटमेंट फॅक्टरमध्ये कसे बदल झाले?

प्रत्येक वेतन आयोगात महागाई, आर्थिक परिस्थिती आणि इतर बाबी लक्षात घेऊन फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करण्यात आले आहेत. 6व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.86 होता. त्यानंतर 7वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा तो 2.57 करण्यात आला. याचा मोठा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला. त्यावेळी किमान बेसिक पगार 7,000 रुपयांवरून थेट 18,000 रुपये करण्यात आला होता.

3.83 फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर काय होईल?

फिटमेंट फॅक्टर किती ठेवायचा याचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. कर्मचारी संघटनांनी 3.83 ची मागणी केली असली तरी सरकार ती जशीच्या तशी मान्य करेलच, याची खात्री नाही. जर सरकारने 3.83 फिटमेंट फॅक्टर मंजूर केला, तर सध्याचा 18,000 रुपयांचा किमान बेसिक पगार थेट 68,940 रुपये होऊ शकतो. म्हणजे किमान वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात सुमारे 51 हजार रुपयांची वाढ होईल.

सरकारकडे इतर पर्याय

सरकारने 3.83 स्वीकारलाच पाहिजे असं बंधन नाही. आयोगाच्या शिफारशींनुसार 2.57 कायम ठेवणं किंवा 3.0, 3.5 अशा इतर पर्यायांचाही विचार केला जाऊ शकतो.

  • फिटमेंट फॅक्टर 3.0 : 54,000 रुपये

  • फिटमेंट फॅक्टर 3.5 : 63,000 रुपये

  • फिटमेंट फॅक्टर 3.83 : 68,940 रुपये

44,900 रुपये बेसिक पगार असलेल्या कर्मचाऱ्याला किती फायदा?

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार 44,900 रुपये असेल, तर फिटमेंट फॅक्टरनुसार त्याचा संभाव्य बेसिक पगार पुढीलप्रमाणे असू शकतो...

  • फिटमेंट फॅक्टर 3.0 : 1,34,700 रुपये

  • फिटमेंट फॅक्टर 3.5 : 1,57,150 रुपये

  • फिटमेंट फॅक्टर 3.83 : 1,71,967 रुपये

वरील सर्व आकडे हे फक्त उदाहरण म्हणून देण्यात आलेले आहेत. फिटमेंट फॅक्टर बदलल्यास पगारात किती फरक पडू शकतो, हे समजावं हा त्यामागचा उद्देश आहे. प्रत्यक्षात 8व्या वेतन आयोगाच्या अंतिम शिफारसी काय असतील आणि त्यानंतर केंद्र सरकार कोणता निर्णय घेईल, यावरच कर्मचाऱ्यांचा सुधारित पगार निश्चित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

Chanakya Niti: या ४ ठिकाणी दान केल्याने वाढते श्रीमंती, चाणक्यनितीतले महत्त्वाचे विचार नक्कीच वाचा

नाशिक हादरलं ! प्रियकराच्या मदतीनं महिलेनं लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराला संपवलं; नंतर कसारा घाटात फेकला मृतदेह

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिंदे गटाचा दावाच खोटा ठरणार? २१ जूनच्या 'त्या' घटनेवरून सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात घणाघात

Maharashtra News Live Update: सचिन अंदुरे जामीन प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुप्रीम कोर्टात जाणार

SCROLL FOR NEXT