Central Government Bonus Saam Tv
बिझनेस

Central Government: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारने बदलले ५ नियम

Central Government Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी या पाच नियमात बदल केले आहे. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

Siddhi Hande

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या नियमांत मोठा बदल

हे ५ नियम बदलले

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीआधी सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुशखबर दिली आहे. कर्मचाऱ्यांसाठी ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ, बोनस, CGHS दरांमध्ये बदल, यूपीएस स्कीमची मर्यादा वाढवणे आणि डिजिटल लाइफ सर्टिफिकेटबाबत निर्णय घेतले आहे. या निर्णयाचा १ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे महागाईपासून दिलासा मिळणार आहे तसेच मेडिक्लेम बिल कॅशलेस होणार आहे.

महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याची घोषणा ही वाढ जुलैपासूनची असणार आहे. यामुळे ४९ लाख सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरुन ५८ टक्के करण्यात आला आहे.

महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याची घोषणा ही वाढ जुलैपासूनची असणार आहे. यामुळे ४९ लाख सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरुन ५८ टक्के करण्यात आला आहे.

CGHS दरात बदल

सरकारने केंद्रीय सरकारी स्वास्थ्य योजनेच्या दरात बदल केला आहे. मेडिकल पॅकेज दरात बदल केले आहेत. हे नवीन दर १३ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यामुळे योजनेअंतर्गत आता मेडिक्लम कॅशलेस होण्यासाठी मदत होणार आहे.

बोनस

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बोनसची घोषणा करण्यात आली आहे. ग्रुप सी आणि नॉन गॅझेटेड ग्रुप बी कर्मचाऱ्यांना ३० दिवसांचा अॅड हॉक बोनस दिला जाणार आहे. याची रक्कम ६९०८ झाली आहे.कर्मचाऱ्यांना ६० दिवसांच्या वेतनासारखे प्रोडक्ट लिंक्ड बोनस मिळणार आहे.

UPS मधील बदल

सरकारने युनिफाइड पेन्शन स्कीममध्ये बदल करण्यात आले आहे. आता कर्मचाऱ्यांना आधीपेक्षा जास्त रिटायरमेंट आणि ग्रॅ्च्युटी देण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीएसमध्ये समाविष्य होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. ही योजना १ एप्रिल २०२५ रोजी लागू करण्यात आली होती.

पेन्शनधारकांसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सुविधा

आता पेन्शनधारकांना दरवर्षी बँकेत ऑफलाइन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. तुम्ही आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देऊ शकतात. यासाठी ते घरी बसून फोन आणि फेस ऑथेंटिकेशनचा वापर करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Director Arrested: ३० कोटींच्या फसवणुक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक आणि पत्नीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Goa Nightclub Fire: गोव्याच्या नाईट क्लबमध्ये 'अग्नीतांडव' नाईट क्लबला आग कशी लागली?

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला हादरा; बडा नेता फोडला, राजकीय समीकरण बदलणार

Maharashtra Live News Update: मुंढवा अमेडिया जमीन खरेदी खत व्यवहारातील मुद्राक दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र तारु यांना अटक

लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर... अजित पवारांचा आमदार नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT