Maharashtrachi Hasyajatra: 'सगळं फिरलो, पण आपलं गावच बरं! हास्यजत्रेच्या मंचावर ओंकार भोजनेचा कमबॅक

Maharashtrachi Hasyajatra Onkar Bhojane: ‘कोकणचा कोहिनूर’ म्हणून ओळखला जाणारा ओंकार हास्यजत्रेच्या मंचावर परताला आहे. तो पुन्हा आपल्या चाहत्यांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.
Maharashtrachi Hasyajatra Onkar Bhojane
Maharashtrachi Hasyajatra Onkar BhojaneSaam Tv
Published On

Maharashtrachi Hasyajatra: मराठी विनोदी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ओंकार भोजनेचा कमबॅक चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. ‘कोकणचा कोहिनूर’ म्हणून ओळखला जाणारा ओंकार दीर्घकाळ या मंचापासून दूर होता, पण आता तो पुन्हा आपल्या चाहत्यांसमोर हसवण्यासाठी परत आला आहे.

ओंकारने यापूर्वी ‘फू बाई फू’ आणि ‘हसताय ना, हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमांमध्ये आपली कमेडीची कला दाखवली होती. आता त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रवेश केला असून, त्याच्या पहिल्या स्किटचा प्रोमो सोनी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Maharashtrachi Hasyajatra Onkar Bhojane
Box office collection: 'कंतारा चॅप्टर १' ने रविवारी केली बंपर कमाई; 'सनी संस्कार...'निघाला फुसका बार

या स्किटमध्ये ओंकारने स्वतःवरच केलेल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्याच्या विनोदी शैलीमुळे आणि नैसर्गिक अभिनयामुळे स्किटला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी या प्रोमोवर प्रेमाचा वर्षाव केला असून, त्यांच्या कमेंट्समध्ये पुन्हा त्याला पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.

Maharashtrachi Hasyajatra Onkar Bhojane
Priyanka Chopra: प्रियंका झाली मावशी; क्यूट स्टाईलमध्ये परी आणि राघव यांना दिल्या शुभेच्छा

ओंकारने आपल्या पुनरागमनाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले, “मी थोडा मागे पडलोय, पण आता पुन्हा हसवण्यासाठी तयार आहे.” या विधानातून त्याच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा हसण्याची तयारी स्पष्ट झाली आहे. तसेच या स्किट दरम्यान परत येण्यावर प्रतिक्रिया देताना ओंकार भोजने बोलला 'सगळं फिरलो, पण आपलं गावच बरं!.

त्याच्या या कमबॅकने शोमध्ये नवीन उत्साह निर्माण केला आहे. चाहत्यांना ओंकारची विनोदी शैली आणि त्याचा नैसर्गिक अभिनय अजूनही आवडतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये त्याचे परत येणे प्रेक्षकांसाठी एक मोठा उत्साहजनक क्षण ठरला आहे.शोच्या निर्मात्यांनी देखील या परत येण्याचा आनंद व्यक्त केला असून, ते म्हणाले की ओंकारच्या कमबॅकमुळे शोला नवीन उर्जा मिळेल आणि प्रेक्षकांना अजून आनंद मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com