Priyanka Chopra: प्रियंका झाली मावशी; क्यूट स्टाईलमध्ये परी आणि राघव यांना दिल्या शुभेच्छा

Priyanka Chopra: बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिची बहीण परिणीती आई झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्रीने संपूर्ण चोप्रा कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत.
Priyanka Chopra
Priyanka ChopraSaam Tv
Published On

Priyanka Chopra: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा यांना मुलगा झाला आहे. रविवारी संध्याकाळी या कपलने एक पोस्ट शेअर केली. या बातमीमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये आनंद पसरला आहे. बाळाची मावशी प्रियांका चोप्रा देखील या सेलिब्रेशनमध्ये सामील झाली, तिने तिच्या स्वतःच्या अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत नवीन बाळाच्या आगमनाबद्दल कुटुंबाला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्रीने तिच्या काकू आणि काकांना टॅग करून त्यांना आजी-आजोबा झाल्याबद्दल अभिनंदन केले.

प्रियांकाने शुभेच्छा दिल्या

मावशी प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर परिणीती आणि राघवची पोस्ट शेअर करत, "अभिनंदन." असे लिहीले. प्रियांकाने तिच्या काकू आणि काका, रीना आणि पवन चोप्रा यांनाही टॅग केले आणि संपूर्ण कुटुंबाला प्रेम पाठवले.

Priyanka Chopra
Box office collection: 'कंतारा चॅप्टर १' ने रविवारी केली बंपर कमाई; 'सनी संस्कार...'निघाला फुसका बार

परिणीती आणि राघव यांनी इंस्टाग्रामवर त्यांच्या मुलाच्या आगमनाची घोषणा करणारी एक गोड पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, "तो अखेर आला आहे! आमचा गोड मुलगा. आधी आम्ही एकमेकांना होतो, आता आमच्याकडे सर्वकाही आहे." सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Priyanka Chopra
Aditi Rao Hydri: अदिती राव हैदरीचा नवा डेनिम कॉर्सेट आणि बबल स्कर्ट लूक पाहिलात का?
Priyanka Chopra
Priyanka Chopra

लग्न

परिणीती आणि राघव यांनी मे २०२३ मध्ये दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये साखरपूडा केले आणि सप्टेंबरमध्ये उदयपूरमधील द लीला पॅलेसमध्ये लग्न केले. काही काळापूर्वी राघवने द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये विनोद करत लवकरच आनंदाची बातमी जाहीर करतील. आणि आता, ती आनंदाची बातमी खरोखरच आली आहे. लग्नाच्या एका वर्षानंतर, या जोडप्याला मुलगा झाला. लहान पाहुण्याच्या आगमनाने दोन्ही कुटुंबे आनंदी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com