Central Government: महामार्गावरील घाणेरड्या शौचालयाचा फोटो काढा अन् बक्षीस मिळवा; NHAIची नवी योजना

NHAI Report Dirty Toilets and get FASTag Recharge: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टोल प्लाझावरील घाणेरड्या टॉयलेटचा फोटो पाठवा अन् बक्षीस मिळवा, अशी नवी योजना सुरु केली आहे.
National Highway Toll Free
National Highway Toll Free Saam TV
Published On

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत त्यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता तुम्ही टोल प्लाझावर गेलात आणि तिथे तुम्हाला घाणेरडे टॉयलेट दिसले आणि तुम्ही त्याची तक्रार केली तर तुम्हाला मोफत १००० रुपयांचा फास्टॅग रिचार्ज मिळणार आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ही नवीन मोहिम सुरु करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संपूर्ण देशात ही योजना सुरु करण्यात येणार आहे.

National Highway Toll Free
FASTags Blacklisting: NHAI 'या' फास्टॅग धारकांना करणार Blacklist, काय आहे लूज फास्टॅगचा अर्थ?

NHAI ची नवी योजना काय?

NHAI ने 'स्पेशल Campaign 5.0 अंतर्गत हे चॅलेंज सुरु केले आहे. यामध्ये तुम्हाला जर टोल प्लाझावर घाणेरडे टॉयलेट दिसले की त्याचा फोटो काढून NHAI ला पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला याचा इनाम मिळणार आहे. तुमच्या फास्टॅगवर १००० रुपयांचा रिचार्ज मिळणार आहे.

तक्रार कशी करायची?

या योजनेअंतर्गत महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवास राजमार्ग यात्रा अॅपद्वारे तक्रार करु शकतात. तुम्हाला घाणेरड्या शौचालयांचे जिओ टॅग आणि टाइम स्टॅम्प केलेले फोटो अपलोड करायचे आहेत. त्यांना त्यांचे नाव, वाहन नोंदणी क्रमांक आणि मोबाईल नंबरदेखील टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला वाहन क्रमांकावर १००० रुपयांचा फास्टॅग रिचार्ज मिळणार आहे.

अटी काय?

योजनेच्या कालावधीत प्रत्येक वाहन नोंदणीला फक्त एकदाच बक्षीस मिळणार आहे. याचसोबत एका दिवसात फक्त एकाच व्यक्तीला हा इनाम मिळणार आहे. एका दिवशी जर अनेक प्रवाशांनी तक्रार केली तरी पहिल्या तक्रारदारालाच बक्षीस मिळणार आहे.

National Highway Toll Free
लय भारी! FASTag नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा, नवा नियम होणार लागू

एनएचआयने म्हटले आहे की, अॅपवरचे फोटो हे स्पष्ट आणि जिओ टॅग केलेले असावे. डुप्लिकेट किंवा जुने फोटो टाकले तर ते स्विकारले जाणार नाही. या सर्व गोष्टी तपासल्या जातील त्यानंतर बक्षीस दिले जाईल.

ही योजना फक्त एनएचआयद्वारे बांधल्या गेल्यावर टोल किंवा शौचालयांवर लागू होणार आहे. पेट्रोल पंप,हॉटेल आणि इतर खाजगी ठिकाणांवरील शौचालयांचा यात समावेश केला जाणार नाही. सरकारच्या या योजनेमुळे स्वच्छतेला महत्त्व मिळणार आहे.

National Highway Toll Free
FASTags Blacklisting: NHAI 'या' फास्टॅग धारकांना करणार Blacklist, काय आहे लूज फास्टॅगचा अर्थ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com