
जे लोक महामार्गावर प्रवास करताना त्यांच्या वाहनाच्या विंडशील्डवर FASTag लावत नाहीत. किंवा कार्ड दाखवून स्कॅन करतात त्याला "लूज फास्टॅग" म्हटलं जातं. या 'लूज' फास्टॅगधारकांना आता तात्काळ काळ्या यादीत टाकला जाणार असल्याचं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जाहीर केले आहे. टोल प्लाझावर होणारी फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
लूज फास्टॅग हे त्या सक्रिय फास्टॅगना दिले जाते जे वाहनाच्या विंडशील्डवर चिकटवले जात नाहीत, परंतु चालक ते हातात धरतो आणि टोल स्कॅनरसमोर दाखवतो. बऱ्याचदा ते एका वाहनातून काढून दुसऱ्या वाहनात बसवले जातात, ज्यामुळे सिस्टममध्ये बिघाड निर्माण होतो. विशेषतः बंद-लूप टोल सिस्टीममध्ये जिथे प्रवेश आणि निर्गमनाच्या आधारावर टोल वसूल केला जातो, तेथे बरेच लोक, अशा टॅग्जशी छेडछाड करून टोल चुकवत असल्याचं समोर आले आहे.
"काही वाहन मालक जाणूनबुजून वाहनाच्या विंडशील्डवर फास्टॅग लावत नाहीत, ज्यामुळे टोल ऑपरेशनमध्ये व्यत्यय येतो, त्यामुळे वाहनांचा लांब रांगा लागत असतात. वाहनधारक त्या कारणामुळे वैतागत असतात. त्यात सिस्टमची फसवणूक होत असते. यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय तर होतेच, शिवाय टोल कंपन्या आणि बँकिंग सिस्टमचेही नुकसान होत असते.
या कारणास्तव, आता NHAI ने टोल एजन्सी आणि सवलती देणाऱ्यांना अशा लूज FASTags ची तात्काळ तक्रार करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकता येईल, असं एनएचएआयकडून सांगण्यात आले आहे.
जे वाहन चालक फास्टॅग विंडशील्डवर ठेवण्याऐवजी हातात धरून स्कॅन करतात. या नवीन नियमाचा सर्वात जास्त परिणाम होईल. आता, टोल प्लाझावर असा टॅग ओळखताच, त्याची तक्रार केली जाणार आहे. तो टॅग ब्लॅकलिस्ट केला जाईल. ब्लॅकलिस्ट केल्यानंतर तो टॅग पुन्हा वापरता येणार नाही किंवा वाहन कोणत्याही अडचणीशिवाय टोल ओलांडू शकणार नाहीत.
बऱ्याचवेळा कारसाठी नोंदणीकृत फास्टॅग ट्रकसाठी वापरले जातात. यामुळे टोल प्लाझावरील स्कॅनर चुकीची श्रेणी ओळखत असतो, त्यामुळे चार्जबॅक किंवा रिफंड विनंती होत असते. याचा परिणाम संपूर्ण इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टमवर होतो. टॅग हातात असल्याने तो वाहनाशी जुळवता येत नाही आणि त्याचा गैरवापरही रोखता येत नाही. NHAI ने आता त्यांचे नियम अधिक कडक केलेत. टोल वसुली एजन्सींना आता कोणतेही फास्टॅग लूज दिसले तर त्याची तक्रार करण्याचे निर्देश दिले आहेत.
यासाठी एक विशेष ईमेल आयडी देखील जारी करण्यात आला आहे, जिथे असे तक्रार पाठवले जातील. अहवाल प्राप्त होताच, FASTag ला काळ्या यादीत टाकले जाईल जेणेकरून त्याचा गैरवापर थांबवता येईल.
वाहन मालकांनी त्यांच्या वाहनाच्या विंडशील्डवर FASTag योग्यरित्या लावणे महत्वाचे आहे. जे लोक ते हातात धरून किंवा वारंवार वाहने बदलून वापरतात त्यांना आता अडचणींना सामोरे जावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.