Dhanshri Shintre
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ५० कोटी वापरकर्त्यांचा टप्पा गाठत अग्रस्थान कायम राखले आहे.
जिओ आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक आणि परवडणाऱ्या रिचार्ज योजना उपलब्ध करून देत वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सोयीस्कर बनवत आहे.
रिचार्ज दर वाढल्यानंतर, जिओने ग्राहकांच्या सोयीसाठी अधिक दीर्घ वैधता असलेले नवीन प्लॅन बाजारात आणले आहेत.
जिओने असा खास प्लॅन सादर केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना जवळपास १०० दिवस रिचार्जची चिंता करावी लागणार नाही.
वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा असेल, तर जिओचा ९९९ रुपयांचा दीर्घ वैधता असलेला प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
या प्लॅनअंतर्गत जिओ यूजर्सना सर्व नेटवर्कवर तब्बल ९८ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देत आहे.
या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबतच जिओ ग्राहकांना दररोज १०० मोफत एसएमएसची अतिरिक्त सुविधा देखील दिली जाते.
या प्लॅनअंतर्गत जिओ ९८ दिवसांसाठी एकूण १९६ जीबी डेटा देते, ज्यात दररोज २ जीबी इंटरनेट मिळते.
या जिओ प्लॅनसोबत ग्राहकांना तीन महिन्यांसाठी जिओ टीव्ही आणि जिओ हॉटस्टारचे मोफत सब्स्क्रिप्शनही दिले जाते.