संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. सेवानिवृत्तीनंतर म्हणजे ५८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळते, त्याला पेन्शन म्हणतात. EPS म्हणजे कर्मचारी निर्वाह निधीतून तुम्हाला ही पेन्शन दिली जाते. परंतु तुम्हाला जर सेवानिवृत्तीच्या आधी पेन्शन हवी असेल तर काय करावे? सेवानिवृत्तीच्या आधी पेन्शन मिळते का असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत असतात. आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. (Pension Rules)
सेवानिवृत्तीपूर्वी पेन्शन काढू शकणार का? (Can We Witdraw pension before retirement)
तुम्ही सेवानिवृत्तीच्या आधी पेन्शन काढू शकतात. परंतु त्यासाठी काही नियमांचे पालन तुम्हाला करावे लागेल.
तुम्ही ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असणे गरजेचे आहे. ज्या कंपनीत २० पेक्षा जास्त लोक काम करतात त्या कंपनीचे सदस्या ईपीएफओमध्ये रजिस्टर असतात.
तसेच तुम्ही दहा वर्षाची सर्व्हिस केलेली असावी. तुम्ही जर ५० ते ५७ वयोगटातील असाल तर तुम्हाला पेन्शन काढला येईल. (Pension Rules)
तुम्ही ५८ वर्षाआधी तुम्ही पेन्शन काढू शकतात. परंतु यामुळे तुमच्या पेन्शनमधील काही पैसे कमी होऊ शकतात. म्हणजेच जर तुम्ही ५४ व्या वर्षी पेन्शन काढली तर तुम्हाला पेन्शनच्या फक्त ८४ टक्के पेन्शन मिळणार आहे. सेवानिवृत्तीच्या आधी पेन्शन काढत असाल तर दर वर्षी तुमचे ४ टक्के अमाउंट कमी होणार आहे.
EPS मधील पैसे किती आहेत? कसं चेक करावं? (EPS Balance Check Process)
तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर जावे. त्यानंतर सर्व्हिसेस या सेक्शनवर क्लिक करा.
यानंतर for employees वर क्लिक करा.
यानंतर खाली तुम्हील पासबुक असा ऑप्शन दिसेल.
त्यानंतर तुम्ही तुमचा यूएएन नंबर टाकावा. यानंतर पासबुकवर क्लिक करा.
यानंतर मेंबर आयडी निवडायचा आहे.त्यानंतर तुम्ही Passbook Overview वर क्लिक करायचे आहे. यात तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.