Pension Saam Tv
बिझनेस

PF Rule: सेवानिवृत्तीआधी PF काढल्यास पेन्शन मिळणार का? काय आहे नियम?

EPFO Pension Rule: जर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीत पीएफमधून पैसे काढले तर तुम्हाला पेन्शन मिळणार का? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पगाराच्या काही टक्के रक्कम जमा केली जाते. पीएफमधील पैसे ही एक गुंतवणूक असते. पीएफमधील गुंतवणूकीवर तुम्हाला सर्वाधिक व्याजदर मिळते.

पीएफमधील पैसे तुम्ही आप्तकालीन परिस्थितीत काढू शकतात. मुलाचे लग्न, घराचे बांधकाम, वैद्यकीय उपचारांसाठी ही रक्कम काढू शकतात. परंतु जर तुम्ही पीएफमधून पैसे काढले तर तुम्हाला पेन्शन मिळणार का?असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर याबाबत पीएफचा नियम काय आहे ते जाणून घेऊया.

जर तुम्हाला ५८ वयानंतर पेन्शन मिळवायची असेल तर त्यासाठी एक अट आहे. तुम्ही कमीत कमी १० वर्षे नोकरी केली तरच तुम्हाला पेन्शन मिळते. (EPFO Rule)

पेन्शनसाठी क्लेम (Pension Claim)

EPFO मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ पगारातील १२ टक्के रक्कम पीएफ अकाउंटमध्ये जमा होते. त्यातील ८.३ टक्के कर्मचाऱ्याच्या अकाउंटमधून जमा केला जातो. तर ३.६७ टक्के रक्कम नियोक्त्याकडून जमा केली जाते. EPFमध्ये तुम्हा ५० वर्षानंतर पेन्शनसाठी दावा करु शकतात.

जर तुम्ही ५८ म्हणजेच सेवानिवृत्तीचे वय पूर्ण होण्याआधीच पेन्शनसाठी दावा करत असाल तर प्रत्येक वर्षी ४ टक्के रक्कम केली जाते. निवृत्तीनंतर तुमच्या EPF मधील ७५ टक्के रक्कम एकत्र मिळते. तर उरलेली २५ टक्के रक्कम ही निवृत्तीनंतर दर महिन्याला मिळते.

पात्रता (pension Eligibility)

जर तुम्ही दहा वर्षे नोकरी केली असेल अन् दर महिन्याला ईपीएफओमध्ये रक्कम जमा करतात तर तुम्हाला ५८ वर्षानंतर पेन्शन मिळते.

ईपीएफओचा नवीन नियम (EPFO New Rule)

सरकारी कर्मचाऱ्यांना आता पीएफचे पैसे एटीएममधून काढता येणार आहे. लवकरच ही सुविधा सुरु केली जाणार आहे. यासाठी पीएफ कर्मचाऱ्यांना एटीएम कार्ड देण्यात येईल. त्यातून तुम्ही पैसे काढू शकतात. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

Sudden death in sleep: झोपेत अचानक मृत्यू होण्यामागची कारणं कोणती? धोका टाळण्यासाठी शरीरातील 'हे' बदल नक्की ओळखा

SCROLL FOR NEXT