Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: गर्लफ्रेंडला देण्यासाठी फुले मिळाली नाही, थेट बिझनेस सुरु करत उभी केली २०० कोटींची कंपनी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ferns And Petals Owner Vikaas Gutgutia Success Story:

यशाचे शिखर गाठण्यासाठी खूप मेहन करावी लागते असे म्हणतात. अशीच मेहनत विकास गुटगुटिया यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. एका आयडियातून त्यांनी आज फुलांचा खूप मोठा व्यवसाय सुरु केला होता. जेव्हा गर्लफ्रेंडला देण्यासाठी बाजारात फुले मिळाली नाही तेव्हा त्यांनी याच आयडियाचा वापर करुन फुलांचा व्यवसाय सुरु केला.

विकास गुटगुटिया यांनी फक्त ५ हजार रुपयांत फुलांचा व्यवसाय सुरु केला होता. मेहनत आणि शिकण्याची वृत्ती या जोरावर त्यांनी त्यांचा व्यवसाय चारपटीने मोठा केला आहे. या त्यांच्या कंपनीचे वार्षिक उत्पन्न ५०० कोटींपर्यंत पोहचवण्याचे त्यांचे ध्येय आहे.

गर्लफ्रेंडला देण्यासाठी फुले मिळाली नव्हती...

प्रत्येक व्यवसाय करण्यासाठी त्यामागची आयडिया महत्त्वाची आहे. त्यांचा व्यवसाय सुरू करण्यामागे एक रंजक गोष्ट आहे. १९९४ मध्ये त्यांना गर्लफ्रेंडला फुले द्यायची होती. परंतु दिल्लीत बाजारात त्यांना चांगली फुले मिळाली नाही. तसेच रस्त्यावर कोमेजलेली फुले दिसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यातूनच त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरु करण्याची आयडिया सुचली.

विकास यांनी फुलांचे दुकान काढण्याचा विचार केला. १९९४ मध्ये त्यांनी फूल आणि गिफ्ट सेंटर सुरु केले. अवघ्या ५००० रुपयांचे भांडवल वापरुन त्यांनी व्यवसाय सुरु केला. त्यानंतर त्यांच्या व्यवसायात एक पार्टनर जोडला गेला. त्यांनी या व्यवसायात अडीच लाख रुपये गुंतवणूक केली. यानंतर त्यांनी दिल्लीत साऊथ एक्स्टेंशनमध्ये २०० स्केअर फूट जागेत फर्न्स इन पेटल्सचे दुकान उघडले.

फूटपाथवर स्वस्त दरात फुले विक्रेत्यांशी स्पर्धा करणे अवघड

रस्त्यावर स्वस्त किमतीत फुले विकली जातात. त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करणे खूप अवघड होते असे विकास यांनी एकदा सांगितले होते. विकास यांनी खूप मेहनतीने आपला व्यवसाय सुरु केला. विकास यांनी आपल्या दुकानात एसी लावले. त्यामुळे तेथील फुले नेहमी ताजी राहायची. याशिवाय त्यांनी पुष्पगुच्छ आणि फुलांच्या हाराला डिझाइनर लूक दिला. त्यामुळे विकास यांना कॉर्पोरेट क्षेत्रातून ऑर्डर मिळू लागल्या.

विकास यांनी स्वतः ची वेबसाइट सुरु केली. ऑनलाईन त्यांना फुले, हार, पुष्पगुच्छ यांच्या ऑर्डर मिळू लागल्या. एकदा २००९ साली त्यांचे २५ कोटींचे नुकसान झाले होते. यातून ते खूप काही शिकले. न खचता त्यांनी पुन्हा व्यवसायावर लक्ष दिले. आज त्यांचा व्यवसाय २०० कोटी रुपयांचा आहे. या कंपनीच्या जगात वेगवेगळ्या देशांमध्ये शाखा आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT