Priya More
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर मुदस्सर खान नुकताच विवाहबंधनात अडकला.
मुदस्सरने गर्लफ्रेंड रिया किशनचंदानीसोबत लग्नगाठ बांधली.
मुदस्सरच्या निकाहचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुदस्सरने स्वत: देखील आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत.
मुदस्सरच्या निकाहला बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानने हजेरी लावली आणि या कपलला शुभेच्छा दिल्या.
मुदस्सरने निकाह केल्यानंतर आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवली होती.
आपल्या लग्नाचे फोटो शेअर करताना कोरिओग्राफर मुदस्सरने आपल्या पत्नीचे वर्णन जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असे केले आहे.
मुदस्सरने लग्नामध्ये क्रीम कलरची शेरवानी घातली होती. तर रियाने मॅचिंग कलरचा लेहेंगा कॅरी केला आहे.