Money Saam TV
बिझनेस

Business Ideas In Marathi: भांडवल ४ हजार, महिन्याला कमाई १ लाख; तरुणी अवघ्या २ महिन्यात झाल्या मालामाल

Small Business Ideas In Marathi: शिक्षण क्षेत्रातही स्त्रियांचा दबदबा पाहायला मिळत आहे. असंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका स्टार्टअपमुळे प्रयागराजच्या दोन तरुणीचं आयुष्य बदलून गेलं आहे.

Vishal Gangurde

Small investment Ideas In Marathi:

भारतासहित जगभरात महिलांच्या हक्काविषयी बोललं जातं. महिलांसाठी विशेष कायदे आहेत. तसेच अनेक योजनाही आहेत. या सुविधांच्या आधाराशिवाय काही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून एकाच क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. आता शिक्षण क्षेत्रातही स्त्रियांचा दबदबा पाहायला मिळत आहे. असंच एक उदाहरण समोर आलं आहे. एका स्टार्टअपमुळे प्रयागराजच्या दोन तरुणीचं आयुष्य बदलून गेलं आहे. (Latest Marathi News)

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, प्रयागराजच्या हिमांशी आणि शिफा या दोन्ही तरुणींच्या स्टार्टअपने कमाल केली आहे. हिमांशी आणि शिफा या दोन्ही तरुणी यूनायटेड कॉलेजमध्ये 'बिझनेस' विषयाचं शिक्षण घेत आहेत.

या दोन्ही तरुणींना त्यांच्या शिक्षकांनी प्रॅक्टिकल म्हणून व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. यानंतर या दोन्ही तरुणींनी हस्तशिल्पसहित स्त्रियांच्या इतर वस्तू विकण्याचा व्यवसाय सुरु केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणींनी ४ हजार भांडवलातून १ लाखांची कमाई कशी केली?

विद्यार्थिनी शिफाने व्यावसायिक कमाई कशी केली याबद्दल माहिती दिली आहे. हँडमेड क्राफ्ट(हस्तशिल्प) विक्री करताना ग्राहकांकडून फिडबॅक (अभिप्राय) लिहिण्यास सुरुवात केली.

ग्राहकांच्या फिडबॅकनंतर वस्तूंमध्ये बदल करु लागलो. ग्राहक मोठ्या आवडीने अभिप्राय देतात. या माध्यमातून प्रचार होऊ लागला. या तरुणींना फिडबॅकचा फायदा अवघ्या दोन आठवड्यात मिळाला.

स्टॉलवर वस्तू कितीला मिळतात?

हिमांशीने सांगितलं की, 'हाताने तयार केलेल्या वस्तू २० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. आम्ही बनवलेल्या वस्तूंना बाजारात खूप मागणी आहे. या वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहक फिडबॅकही देतात. या फिडबॅकमुळे व्यवसायाचा प्रचारही होतो'. तसेच या स्टार्टअपमध्येच पुढे करियर करण्याचा विचार असल्याचंही हिमांशीने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Maharashtra Live News Update: मनमाडकरांना दिलासा; पाणी पुरवठा करणारे वागदरडी धरण 50 टक्के भरले

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

SCROLL FOR NEXT