Business Idea : अनोळखी लोकांशी बोलायला आवडतं? मग ऑनलाइन गप्पा मारून मिळवा भरघोस पैसे

Podcasting Business Idea : ऑफलाइन मार्केटमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे गुंतवणूक नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त इंटरनेटवर बोलून पैसे कमवू शकता. यासाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही.
Business Idea
Business IdeaSaam Tv
Published On

Podcast :

ऑफलाइन मार्केटमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे गुंतवणूक नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त इंटरनेटवर बोलून पैसे कमवू शकता. तुम्ही जे बोलता ते लोकांना आवडले पाहिजे आणि सर्व चांगल्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. यासाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही. जास्त टेक्नॉलिजीच्या अभ्यासाचीही गरज नाही. तुम्ही 10वी, 12वी उत्तीर्ण विद्यार्थी असलात किंवा गृहिणी जरी असलात तरी देखील सहज पैसे (Money) कमवू शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्ही Podcasting बद्दल ऐकले असेलच. इंटरनेटवर अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यावर तुम्ही तुमचे पॉडकास्ट चॅनल तयार करू शकता. YouTube वर एक पॉडकास्ट चॅनेल देखील तयार करता येते. यामध्ये तुम्ही कोणत्याही एका विषयावर कोणत्याही व्यक्तीशी चर्चा करू शकता. किंवा दोन लोक आपापसात एखाद्या विषयावर चर्चाही करू शकतात. तुम्ही हे संभाषण तुमच्या पॉडकास्ट चॅनेलवर अपलोड (Upload) करा.

Business Idea
Business Plan By Chanakya Niti : व्यवसाय सुरू करायचा आहे? या 5 गोष्टी लक्षात घ्या, कोणतीही अडचण वाटेला येणार नाही

तुमचे प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनेलसाठी जाहिराती आणण्याचे काम करेल. Instagram आणि YouTube प्रमाणे, पॉडकास्ट चॅनेलवर तुमचे जितके जास्त फॉलोअर्स असतील, जितके जास्त लोक तुमची संभाषणे ऐकतील, तितक्या लोकांना जाहिराती ऐकू येतील. आणि तुमची कमाई होईल.

पॉडकास्ट चॅनल सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?

पॉडकास्टिंगची किंमत शून्य आहे. हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरही (Mobile) करू शकता. नंतर पैसे सुरू झाल्यावर तुम्ही काही प्रोडक्ट घेऊ शकता. तेव्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही पॉडकास्ट सुरू करण्यासाठी किंमत सुमारे ₹10000 ते ₹50000 असू शकते.

Business Idea
Business Idea : फक्त 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून करा हा बिझनेस सुरू, महिन्यात लखपती व्हाल

पॉडकास्ट चॅनेलवरून कसे कमवायचे?

जाहिरातीं व्यतिरिक्त, बहुतेक उत्पन्न प्रायोजकत्वातून (Sponsor) येते. एकदा तुमचे चॅनल लोकप्रिय झाले की तुमच्याकडे प्रायोजकांची कमतरता राहणार नाही. आता यूट्यूबवरही पॉडकास्ट चॅनल तयार करता येईल. YouTube वर जाहिरातीतून कमाई चांगली होते.

पॉडकास्ट चॅनेलसाठी सॉफ्टवेअर

पॉडकास्ट चॅनेलशी संबंधित सर्व सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी लॅपटॉप असणे पुरेसे आहे. भारतातील हजारो लोक त्यांच्या स्मार्टफोनवरून पॉडकास्ट चॅनेल चालवत आहेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न प्रत्येक वर्षी वाढतच जाते. भारतातील पॉडकास्ट चॅनेलमधून लोक दरमहा लाखो रुपये कमावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com